सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, चाहत्यांना केली ‘ही’ विनंती

सिद्धार्थ शुक्लाच्या निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाले.

sidharth-shukla
(Photo-Sidharth Shukla Instagram)

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या आकस्मिक निधनानंतर त्याच्या घरच्यांवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. २ सप्टेंबर रोजी सिद्धार्थ शुक्लाचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे मुंबईतील कुपर रुग्णालयाने माहिती दिली. यानंतर सोमवारी सिद्धार्थच्या कुटुंबियांनी एक ऑफिशियल स्टेटमेंट जारी केलं आहे.

सिद्धार्थचं कुटुंब अजून दु:खातून सावरलं नसून सिद्धार्थ शुक्लाच्या जीवन प्रवासातील प्रत्येक माणसाबद्दल त्याच्या कुटुंबाने कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसचं कुटुंबाच्या प्रायव्हसीचा मान राखावा अशी विनंती करण्यात आली आहे. तसचं सिद्धार्थ कायम आपल्या हृदयात राहील. असं या स्टेटमेंटमध्ये सांगण्यात आलंय.

sidharth-shukla-post
Photo-Siddharth Shukla family Official Statement

या अधिकृतरित्या जाहीर केलेल्या स्टेटमेंटमध्ये सिद्धार्थच्या परिवाराने मुंबई पोलिसांनी केलेल्या मदतीचे आभार मानले आहेत तसंच त्याला मनात आणि आठवणीत ठेवा अशीही भावना व्यक्त केली आहे. सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाज गिल  माग्याच्या आठवड्यात ‘बिग बॉस ओटीटी’ या शो मध्ये गेस्ट म्हणून आले होते. त्याच्या अचानक निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्रीला खुप मोठा धक्का बसला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Actor siddharth shukla death shukla family release official statement says we are still grieving from loss aad

ताज्या बातम्या