Entertainment News Today, 24 June 2025 अभिनेता श्रीकांतला सोमवारी चेन्नई पोलिसांनी अमली पदार्थांच्या आरोपाखाली अटक केली. त्यानंतर नुंगमबक्कम पोलिसांनी त्याची चौकशी केली. तसेच सरकारी रुग्णालयात करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत त्याच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये त्याने अमली पदार्थांचे सेवन केल्याचं आढळून आलंय.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने द हिंदूशी बोलताना श्रीकांतच्या अटकेची पुष्टी केली आहे. तसेच श्रीकांत अलीकडेच ताब्यात घेतलेल्या तीन अमली पदार्थ गुन्हेगारांंच्या नियमित संपर्कात होता, असंही त्यांनी सांगितलं.
चेन्नईतील पबमध्ये झालेल्या भांडणानंतर अण्णाद्रमुकच्या प्रसाद नावाच्या एका माजी सदस्याला अटक करण्यात आली, त्यानंतर श्रीकांतला अटक झाली. प्रसाद ड्रग्ज घेत होता. प्रसादच्या चौकशीदरम्यान श्रीकांतचे नाव समोर आल्याचे वृत्त आहे.
श्रीकांतने तमिळ चित्रपट रोजा कूट्टममधून पदार्पण केलं होतं. नंतर एप्रिल मधाथिल, मानसेल्लम आणि पार्थिबान कनावू सारख्या हिट चित्रपटांमध्ये त्याने काम केलं. २०२३ मध्ये, त्याने ओकारीकू ओकारू या चित्रपटातून तेलुगू सिनेविश्वात पदार्पण केलं. काना कंडें, अडावरी मतलाकू अर्धालु वेरूले, बोस, पू, कॉफी विथ काधल, आणि नानबन हे त्याचे गाजलेले सिनेमे आहेत.