अभिनेत्री आलिया भट्ट ही पदार्पणापासूनच काही ना काही कारणाने चर्चेत राहिलेली अभिनेत्री आहे. दिग्दर्शक महेश भट आणि सोनी राझदान यांची मुलगी. एका मागून एक सुपरहिट चित्रपट देऊन तिने इंडस्ट्रीत स्वतःचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. आजही आलियाचं नाव बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. त्यामुळे आलियाच्या प्रत्येक हालचालींकडे चाहत्यांचं बारीक लक्ष असतं.आलियाचा नुकताच डार्लिंग हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या जोडीने नुकतेच एक लाईव्ह सेशन केले. या सेशनमध्ये येणाऱ्या ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी चित्रपटाबद्दल आपल्या चाहत्यांना माहिती दिली. प्रेक्षकांनी देखील आपल्या मनातील प्रश्न त्या दोघांना विचारले. आलिया सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मिड डेने सुद्धा तिची मुलाखत घेतली ज्यात तिने आपल्या पहिल्या चित्रपटाच्या कमाईबद्दल सविस्तररित्या माहिती दिली आहे.

रणबीरने आलियाबद्दल उघड केले मोठे गुपित, म्हणाला ‘तिला पाहताच…’

आलिया मुलाखतीत असं म्हणाली की, ‘मला माझ्या पहिल्या चित्रपटासाठी जे मानधन मिळाले ते मी थेट माझ्या आईकडे दिले होते. मी तिला म्हंटले की, यापुढे तूच माझे आर्थिक व्यवहार सांभाळायचे’. आलियाची आई सोनी राझदान ही देखील अभिनेत्री आहे. राजी चित्रपटात तिने आलियाच्या आईचीच भूमिका केली होती. आलियाच्या पहिल्या चित्रपटासाठी तिला १५ लाख रुपये इतके मानधन मिळाले होते. स्टुडंट ऑफ द इयर हा तिचा पहिला चित्रपट जो २०१२ साली प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटात अनेक नवखे कलाकार दिसले होते. वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा यासारखे अभिनेते बॉलिवूडला मिळाले. याच चित्रपटात ऋषी कपूर, राम कपूर, रोनित रॉयसारखे दिग्गज कलाकार देखील होते. घराणेशाहीची मक्तेदारी करणारा हा चित्रपट आहे अशी टीका देखील करण जोहरवर करण्यात आली होती. तो या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि निर्माता होता.