पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता देशात २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित केला आहे. त्यामुळे सध्या या काळात देशातील प्रत्येक नागरिक घरातच आहे. मात्र सतत घरात बसून करावं काय हा प्रश्न नागरिकांना सतावत होता. त्यामुळेच नागरिकांचं मनोरंजन करण्यासाठी ८० च्या दशकातील लोकप्रिय ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या दोन मालिका पुन्हा एकदा प्रसारित करण्यात आल्या आहेत.मात्र रामायण ही मालिका सुरु झाल्यापासून अभिनेत्री कविता कौशिक सतत वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत येत आहे. आता कविता पुन्हा एकदा नवीन ट्विट करुन चर्चेत आली आहे.

एफआयआर मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत झळकलेली अभिनेत्री कविता कौशिक  गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत येत आहे. अलिकडेच तिने रामायण मालिकेवर ट्विट करुन नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं होतं. यावेळीदेखील तिने असंच काहीसं ट्विट केलं आहे.


‘हे देवा आम्हा मुर्ख आणि स्वार्थी लोकांना माफ कर. ज्यावेळी आमच्यावर संकट कोसळलं त्यावेळी आम्हाला तुझी आठवण आली आणि आम्ही तुझ्या मालिका पाहू लागलो. नाहीतर आम्ही कायम ‘बिग बॉस’ आणि ‘रोडीज’ हेच शो पाहण्यात दंग असतो’, असं ट्विट कविताने केलं आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात सुरु झालेल्या रामायण मालिकेने केवळ ४ भागांमध्येच १७० मिलियन व्ह्युज मिळविले. त्यामुळए रामनांद सागर यांच्या या मालिकेने छोट्या पडद्यावरील सर्व रेकॉर्ड मोडून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मात्र ही मालिका सुरु झाल्यापासून कविता सतत वक्तव्य करत आहे.‘तुम्ही संसदेत बसून मोबाइलवर पॉर्न पाहता आणि आम्हाला रामायण पाहण्यास सांगता’ असं ट्विट कविताने केलं होतं. तिच्या या ट्विटनंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले.