आलिया आणि रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर एकीकडे बॉयकॉट ब्रह्मास्त्र हा ट्रेंड सुरू आहे तर एकीकडे ब्रह्मास्त्र पाहायला लोकांची गर्दीदेखील दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच याविषयी नकारात्मक गोष्टी सोशल मीडियावर पसरवल्या जात होत्या. चित्रपटाचं बुकिंग आधीच जोरदार झालं होतं. नुकतंच या चित्रपटाने १०० कोटी कमावल्याची बातमी समोर येत आहे.

आणखी वाचा : आमिर, अक्षयनंतर अजय देवगणला बॉयकॉट करण्याची होतेय मागणी, जाणून घ्या कारण

प्रेक्षक, समीक्षक यांच्या या चित्रपटाच्या बाबतीत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. तसेच चित्रपटसृष्टीतल्या लोकांनीदेखील या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. नुकतंच रणबीर कपूरची आई, अभिनेत्री नीतू कपूर यांनी स्वतः ब्रह्मास्त्रबद्दलची त्यांची प्रतिक्रिया व्यक्य केली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्रह्मास्त्रचा दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि रणबीर-आलिया यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या एक दिवस आधी त्यांच्या काही जवळच्या मित्रांसाठी चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग ठेवले होते. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नीतू कपूर ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपट पाहिल्यानंतर दिग्दर्शक अयान मुखर्जीशी बोलताना दिसत आहेत.

नीतू कपूर आणि अयान मुखर्जीचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. त्यात अयान नीतू कपूर यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, नीतू कपूर अयान मुखर्जीला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाबद्दल त्यांनी सांगितलं, “चित्रपटाचा क्लायमॅक्स मनोरंजक आणि छान आहे, पण पुर्वाध… बनायला थोडा वेळ लागतो. पण एकदा चित्रपट सुरू झाला की….”

हेही वाचा : “अयान मुखर्जीला हुशार म्हणणाऱ्यांना तुरुंगात पाठवले पाहिजे…” ‘ब्रम्हास्त्र’वर कंगनाची आगपाखड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट जगभरात ९००० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगनेही विक्रमी कमाई केली. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट यांनी एकत्र काम केलं आहे. त्या व्यतिरिक्त ‘ब्रह्मास्त्र’मध्ये अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन अक्किनेनी, डिंपल कपाडिया आणि दिव्येंद्र शर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी प्रेक्षकांकडून केली जात होती. पण या ट्रेंडचा या चित्रपटावर काही परिणाम झालेला दिसत नाही.