‘बॉलिवूडचा सिंघम’ अशी ओळख असणारा अभिनेता म्हणून अजय देवगणला ओळखलं जाते. बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या नावांच्या यादीत अजय देवगणचे नाव घेतले जाते. नुकतंच अजय देवगणने सिनेसृष्टीत ३० वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने अनेक बॉलिवूड कलाकार, त्याचे मित्र, चाहते सोशल मीडियावर पोस्ट करत त्याला शुभेच्छा देत आहेत. दरम्यान अजय देवगणसोबत अनेक चित्रपटात काम केलेल्या अभिनेता अक्षय कुमारने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच सिनेसृष्टीत ३० वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.

अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर अजय देवगणसोबतचा सूर्यवंशी चित्रपटातील एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तो म्हणाला की, “मला अजूनही आठवतंय, की जेव्हा आपण नवीन होतो. तेव्हा तू आणि मी एकत्र जुहू बीचवर मार्शल आर्टचा सराव करायचो आणि त्यावेळी तुझे वडील आपल्याला याचे प्रशिक्षण द्यायचे. ते कसले दिवस होते यार…,अशाचप्रकारे ‘फूल और कांटे’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन ३० वर्ष झाली आहेत. वेळ किती वेगाने जातो. आपली मैत्री मात्र अशीच अखंडित राहू दे,” असे अक्षय म्हणाला.

दरम्यान बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही अजय देवगणला शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी याबाबतचे ट्वीट केले आहे. बिग बी म्हणाले की, “अजय देवगणने चित्रपट सृष्टीत ३० वर्षे पूर्ण केली आहेत. त्याचा पहिला चित्रपट ‘फूल और कांटे’ २२ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला होता. गोड बोलणारा, फारसा त्रास न देणारा आणि तरीही प्रत्येक गोष्टींची उत्सुकता असलेल्या अजयला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. पुढील ७० वर्षे तू असाचप्रकारे काम करत राहो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना,” असे त्यांनी म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान काही दिवसांपूर्वी अजय देवगणचा ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. अजय देवगण लवकरच ‘मैदान’, ‘थँक गॉड’, ‘RRR’ आणि ‘गंगूबाई काठियावाड़ी’ यासारख्या काही चित्रपटात झळकणार आहे.