Video : बीएसएफ जवानांसोबत थिरकला अक्षय कुमार

‘केसरी’ चित्रपट २१ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘केसरी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचं प्रमोशन सुरु आहे. या प्रमोशनसाठी अक्षय आणि परिणीती चोप्राने नुकतीच दिल्लीत हजेरी लावली असून यावेळी त्यांनी बीएसएफ जवानांची भेट घेतली. या भेटीमध्ये अक्षय आणि परिणीती बीएसएफ जवानांसोबत केसरीमधील ‘सानू केंदी’वर थिरकल्याचं पाहायला मिळालं. सध्या या डान्सचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अक्षय आणि परिणीतीसोबत बीएसएफ जवानांनीही ‘सानू केंदी’वर ठेका धरल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे अक्षयचा सैन्यप्रती असलेला आदर साऱ्यांनाच ठावूक आहे.अनेक वेळा अक्षयने शहीद झालेल्या बीएसएफ जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हातही पुढे केलेला आहे. त्याचा आगामी केसरी हा चित्रपट देशभक्तीवर आधारित असल्यामुळे या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने बीएसएफ जवानांची भेट घेतली. यावेळी त्याने जवानांसोबत डान्स केल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, अक्षयचा आगामी ‘केसरी’ चित्रपट २१ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत परिणीती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अनुराग सिंह दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शन आणि अक्षयने केली आहे.

‘केसरी’ हा चित्रपट ३६ व्या शीख रेजिमेंटचे २१ सैनिक आणि दहा हजार अफगाण सैनिकांमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धावर आधारीत आहे. भारताच्या इतिहासात लढलेली सर्वात धाडसी आणि अविश्वसनीय लढाई अशा शब्दात नेहमीच सारागढीच्या युद्धाचं वर्णन केलं जातं. १० हजार सैन्याच्या रुपानं मृत्यू समोर असतानाही न डगमगता या २१ वीरांनी शेवटच्या श्वसांपर्यंत लढा देत आपलं नाव इतिहासात सुवर्णाक्षरात अजरामर केलं. ही शौर्यगाथा ‘केसरी’मध्ये पाहायला मिळणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Akshay kumar and parineeti chopra shake a leg with bsf jawans in delhi

ताज्या बातम्या