बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘बच्चन पांडे’मुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारचा चित्रपटातील लूक समोर आला होता. अक्षयचा लूक पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. त्यापाठोपाठ आता या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

अक्षय कुमारने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ‘बच्चन पांडे’ चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले आहे. ‘चित्रपटात अॅक्शन, कॉमेडी, रोमॅन्स आणि ड्रामाचा भरणा असणार आहे. चित्रपट होळीच्या मुहूर्तावर, १८ मार्च २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे’ या आशयाचे ट्वीट अक्षय कुमारने केले आहे. त्यासोबतच त्याने चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले आहे.

यापूर्वी हा चित्रपट २६ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार होता. पण करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे म्हटले जात आहे. आता हा चित्रपट होळीच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १८ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बच्चन पांडे या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार असून अभिनेत्री क्रिती सेनॉन त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तसंच अर्शद वारसी, जॅकलीन फर्नांडिस, पंकज त्रिपाठी ही कलाकारमंडळीदेखील महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत.