Akshay Kumar Viral Video : अक्षय कुमारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हायरल व्हिडीओमध्ये अक्षय कुमार चाहत्यांबरोबर फोटो काढत आहे. दरम्यान, तो एका माणसाला त्याच्या खांद्यावर हात ठेवण्यापासून रोखतो.

अक्षय कुमारचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, लोक या वर्तनावर आपले मत व्यक्त करीत आहेत. काही जण म्हणतात की, अक्षयने योग्य काम केले, तर काहींना वाटते की, त्याने जे केले ते चुकीचे होते.

अक्षय कुमारचा व्हिडीओ व्हायरल

अक्षय कुमारचा हा व्हिडीओ बॉलीवूड सोसायटी नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये काही चाहते अक्षय कुमारकडे फोटो काढण्यासाठी जातात. एक व्यक्ती त्याच्या मोबाईल फोनने सेल्फी घेत असताना, त्याच्या मागे उभा असलेला एक माणूस अक्षय कुमारच्या खांद्यावर हात ठेवतो.

अक्षय कुमार त्या माणसाने त्याच्या खांद्यावर हात ठेवताच चिडतो. तो मागे वळून म्हणतो, “खांद्यावर हात नको ठेऊ.” अक्षय कुमारच्या या व्हिडीओवर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी आपली मते व्यक्त केली आहेत. काहींचे मत आहे की, चाहत्यांनी स्टार्सच्या इतक्या जवळ उभे राहू नये. असे केल्याने कोणालाही अस्वस्थ वाटेल. काहींचे असेही मत आहे की, अक्षय कुमारने असा अहंकार दाखवू नये.

एका नेटकऱ्याने व्हिडीओवर कमेंट करीत लिहिले, “लव्ह यू, अक्षय सर.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, “कोणाचाही अहंकार टिकत नाही.” तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, “म्हणूनच मला सेलिब्रिटी आवडत नाहीत.” काही लोकांनी अक्षयच्या बाजूनेही कमेंट केली. एका नेटकऱ्याने लिहिले, “भाऊ, तू बरोबर आहेस.” , दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, “जर कोणी येऊन कोणाच्या पाठीवर हात ठेवला, तर कोणालाही वाईट वाटेल.”

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षयबरोबर अर्शद वारसीदेखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सुरुवातीच्या काळात अक्षयने अनेक ॲक्शन चित्रपटांमध्ये काम केले, ज्यामुळे त्याला ‘खिलाडी’ म्हणून ओळख मिळाली. ‘खिलाडी’, ‘मोहरा’ व ‘मैं खिलाडी तू अनाडी’ यांसारख्या चित्रपटांनी त्याला यश मिळवून दिलं. अक्षयच्या आगामी ‘हेराफेरी ३’, ‘हैवान’, ‘भूत बंगला’ या सिनेमांची सर्वांना उत्सुकता आहे.