Akshay Kumar Offered Sara Ali Khan Garlic as Prasad : अक्षय कुमारच्या विनोदी शैली सर्वांनाच ज्ञात आहे. चित्रपटसृष्टीशी संबंधित अनेक लोकांबरोबर अक्षयने प्रॅन्क केला होता. त्याने सारा अली खानवरही असाच प्रॅन्क केला होता. अक्षयने स्वतः ‘आप की अदालत’ या शोमध्ये याबद्दल खुलासा केला आहे.

आप की अदालत या शोमध्ये अक्षय कुमारने त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल उघडपणे सांगितले आणि त्याने लोकांची तो कशी खिल्ली उडवतो हे उघड केले. अक्षयने खुलासा केला की, त्याने एकदा सारा अली खानला प्रसाद म्हणून लसूण दिले होते आणि एकदा त्याने अमिताभ बच्चन यांचे घड्याळदेखील चोरले होते.

रजत शर्मा यांनी अमिताभ बच्चन यांनी सांगितलेला किस्सा सांगितला. त्यामध्ये ते म्हणाले, “अक्षय लोकांशी हस्तांदोलन करताना घड्याळे चोरण्यासाठी ओळखला जातो.” त्यावर हसत अक्षय म्हणाला, “हो, मी एकदा अमिताभ बच्चनचे घड्याळ चोरले होते. कोणाच्या लक्षात न येता, घड्याळे कशी चोरायची हे मला माहीत आहे. मी ही युक्ती शिकलो आहे. मी तुमचे घड्याळदेखील चोरू शकतो; पण मी ते नेहमीच परत करतो.” जेव्हा अक्षयला विचारण्यात आले की, त्याने कधी त्याची पत्नी ट्विंकल खन्नाचे घड्याळ चोरण्याचा प्रयत्न केला आहे का, तेव्हा तो गमतीने म्हणाला, “जर मी तसे करण्याचा प्रयत्न केला, तर ती मला मारून टाकेल.”

त्यानंतर अक्षयला विचारण्यात आले की, त्याने साराला प्रसाद म्हणून लसूण खायला दिले होते का? अक्षय हसला आणि म्हणाला, “हो, ते नक्कीच घडले असेल. प्रॅन्क हानिकारक नसून मजा करण्यासाठी असतात. लसूण आरोग्यासाठी चांगले आहे.”

अक्षय कुमारचा “जॉली एलएलबी ३” हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. ‘सॅकनिल्क’च्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी १२.७५ कोटी आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी २० कोटी कमावले. सुभाष कपूर दिग्दर्शित ‘जॉली एलएलबी’ हा सिनेमा १५ मार्च २०१३ रोजी रीलिज झालेला, ज्यात अर्शद व सौरभ महत्त्वाच्या भूमिकेत होते. १० कोटींचे बजेट असणाऱ्या या सिनेमाने अंदाजे ४६ कोटी कमावले. त्यानंतर १० फेब्रुवारी २०१७ रोजी त्याचा दुसरा भाग प्रदर्शित झाला, ज्यात अर्शदला अक्षयने रिप्लेस केले होते. ३० कोटींचे बजेट असणाऱ्या या सिनेमाने १९७.३३ कोटी कमावले होते.