‘अक्षयला गरीबांचा मिथुन चक्रवर्ती बोलायचे; माझ्या गाण्यांमुळे…’, अभिजीत भट्टाचार्य

अभिजीत भट्टाचार्य यांनी एका मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे.

akshay kumar was gareebo ka mithun chakraborty
अक्षयला गरीबांचा मिथुन चक्रवर्ती बोलायचे.

बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक अभिजीत भट्टाचार्य हे ९०च्या दशकातील लोकप्रिय गायकांपैकी एक आहेत. अभिजीत त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, सध्या ते बॉलिवूडपासून लांब आहेत. अभिजीत यांनी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानसाठी अनेक गाणी गायली आहेत. त्यामुळे त्यांना वाटते की त्यांचा आवाज हा सुपरस्टार कलाकारांसाठी असून साधारण कलाकरांसाठी नाही.

अभिजीत यांनी ‘इंडिया डॉट कॉम’ला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी सांगितले की त्यांचा आवाज हा सुपरस्टार कलाकारांसाठी असून साधारण कलाकारांसाठी नाही. “मी साधारण कलाकारांसाठी नाही तर सुपरस्टार कलाकारांसाठी गाणं गातो. जर चित्रपटात सुपरस्टार नाही आहे तर मी किती ही चांगलं गाणं गात असलो तरी त्याचा काही फरक पडतं नाही. शाहरुख खान आणि सुनील शेट्टी आज सुपरस्टार आहेत आणि मी त्या दोघांसाठी गाणी गायली आहेत. या कलाकारांसाठी मी गायलेली सगळी गाणी हिट झाली आहेत,” असे अभिजीत म्हणाले.

आणखी वाचा : ‘निर्मात्याने मला हॉटेल रूममध्ये…’, नीना गुप्ता यांनी सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अभिजीत यांना विश्वास आहे की गाण्यांमुळे एखादा कलाकार हा सुपरस्टार होऊ शकतो. त्यासाठी अक्षय कुमारचे उदाहरण देत ते म्हणाले, “माझ्या गाण्यांमुळे अक्षय कुमार लोकप्रिय झाला. जेव्हा तो आला तेव्हा तो लोकप्रिय नव्हता, ज्याप्रमाणे मिथुन चक्रवर्तीला गरीबांचा अमिताभ बच्चन म्हणायचे त्याप्रमाणे अक्षयला गरीबांचा मिथुन चक्रवर्ती म्हणून ओळखायचे, गाण्यांमुळे देव आनंद, राज कपूर आणि राजेश खन्ना स्टार झाले होते. ‘खिलाडी’नंतर अक्षय कुमार स्टार झाला. हे सगळे कलाकार माझ्या गाण्यांमुळे लोकप्रिय झाले.” दरम्यान, अभिजीत यांनी १९९२ मध्ये अक्षयच्या ‘खिलाडी’ या चित्रपटातील लोकप्रिय गाणं ‘वादा रहा सनम’ गायले होते.

आणखी वाचा : ‘तू तिसरं लग्न करणार आहेस?’ श्वेता तिवारी झाली ट्रोल

अभिजीत यांनी काही दिवसांपूर्वी सिंगिंग रिअॅलिटी शोच्या परीक्षकांवर टीका केली होती. ते म्हणाले होती की या परीक्षकांकडे कोणता ही अनुभव नाही आणि ते फक्त स्वत: च प्रमोशन करतात. अभिजीत पुढे म्हणाले की त्यांच्यासारखे गायक ज्यांनी या इंडस्ट्रीसाठी खूप काही केलं आहे त्यांना रिअॅलिटी शोचे परीक्षक बनवले पाहिजे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Akshay kumar was gareebo ka mithun chakraborty says abhijeet bhattacharya dcp