बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाच्या चर्चांना मागच्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं. चाहत्यांना दोघांच्या लग्नाबाबत कमालीची उत्सुकता होती. काल १४ एप्रिल रोजी हे दोघे लग्नबंधनात अडकले. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. पण तुम्हाला माहित आहे का रणबीर आणि आलियाने सप्तपदी नाही तर फक्त चार फेरे घेतले. रणबीर आणि आलियाने लग्नाची परंपरा बदलली आहे. याविषयी आलियाचा भाऊ राहुल भट्टने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

राहुलने नुकतीच ‘इंडिया टुडे’ला मुलाखत दिली होती. यावे रणबीर आणि आलियाच्या लग्नाविषयी बोलताना तो म्हणाला, “रणबीर-आलियाने त्यांच्या लग्नात ७ नव्हे ४ फेरे घेतले. त्यांच्या लग्नात खास पंडित होते. हे पंडित अनेक वर्षांपासून कपूर कुटुंबा सोबत आहेत. त्यावेळी प्रत्येक फेऱ्याचे महत्त्व सांगत राहुल म्हणाला, एक असतो धर्मासाठी, एक असतो मुलांसाठी… त्यामुळे हे सर्व खरोखरच आकर्षक होतं. मी अशा कुटूंबाचा भाग आहे जिथे अनेक धर्माचे लोक एकत्र राहतात. तर आलिया आणि रणबीरने ७ नाही तर ४ फेरे घेतले आणि चारही फेऱ्यांच्यावेळी मी तिथेच होतो.”

आणखी वाचा : लग्न आलिया रणबीरचं पण चर्चा तैमूरच्या Attitude ची, पाहा Viral Video

आणखी वाचा : लग्न न करता प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीला सतीश कौशिक यांनी घातली होती लग्नाची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लग्नानंतर आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे की रिसेप्शन कधी होणार? लग्नाचे सर्व विधी आटोपल्यानंतर नीतू कपूर मुलगी रिद्धिमा आणि जावई भरत साहनीसोबत मीडियासमोर आल्या. त्यावेळी त्यांनी सगळ्यांचे आभार मानले. याशिवाय मीडियाने रिसेप्शनबद्दल विचारले असता त्यांनी रिसेप्शन होणार नसल्याचे स्पष्ट केले.