आलिया भट्ट सध्या वेगवेगळ्या सिनेमांच्या प्रोजेक्टवर काम करतेय. या व्यस्त वेळापत्रकातही आलिया सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. नुकताच आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोतील एका खास गोष्टीने अभिनेता आयुष्मान खुरानाचं लक्ष वेधलं. आयुष्मानने आलियाच्या फोटोवर कमेंट केलीय.

आलियाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत तिने हिरव्या रंगाचं क्रॉप टॉप आणि डेनिम परिधान केलीय. तिने तिचा चेहरा एका पानाने लपवला आहे. या फोटोत आलियाच्या हातात दोन अंगठ्या दिसत आहेत. यातील एका अंगठीत आठ हा आकडा कोरलेला दिसतोय. “छोट्या छोट्या गोष्टी” असं कॅप्शन तिने या फोटोला दिलंय. दरम्यान, अभिनेता आयुष्मान खुरानाने आलियाच्या फोटोवर कमेंट केलीय. ‘हा फोटो म्हणजे एक शुद्ध कला आहे.” अशी कमेंट त्याने केलीय.

अखेर अंकिता लोखंडे बोहल्यावर चढणार, ‘या’ तारखेला बॉयफ्रेण्ड विक्की जैनसोबत करणार लग्न

तर आलियाने देखील आयुष्मानला रिप्लाय दिलाय. “अरे वा..वा..धन्यवाद” असं म्हणत तिने आयुष्मानचे आभार मानले आहेत. तर आलियाच्या आईने ”लाईक यू” अशी कमेंट केलीय. आलियाच्या या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी पसंती देत कमेंट केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आलिया लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’मध्ये झळकणार आहे. फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’मध्येही ती प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफसोबत झळकणार आहे.