अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. एवढंच नाही तर ओटीटीवर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची बरीच क्रेझ पाहायला मिळाली. या चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका यांच्या भूमिका तर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याच पण आणखी एक भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली ती म्हणजे, पुष्पाच्या आईची. पुष्पाच्या आईची भूमिका या चित्रपटात अभिनेत्री कल्पलता यांनी साकारली आहेत. पण प्रत्यक्षात अल्लू अर्जुन आणि त्याच्या आईची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीच्या वयात अवघ्या काही वर्षांचं अंतर आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेत्री कल्पलतानं ५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय तिने जवळपास १० टीव्ही मालिकांमध्येही अभिनय केला आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर ‘पुष्पा’ चित्रपटात अल्लू अर्जुनच्या आईची भूमिका साकारत तिने सर्वांनाच चकीत केलं होतं. पण चित्रपटात अनेक ठिकाणी प्रेक्षकांना भावुक करणाऱ्या कल्पलताचं वय ऐकून मात्र सर्वांनाच धक्का बसेल.

Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

अल्लू अर्जुन आणि कल्पलता यांच्या वयात ३ वर्षांचं अंतर आहे. अल्लू अर्जुनचं वय सध्या ३९ वर्षं आहे तर कल्पलता ४२ वर्षांची आहे. या दोघांमध्ये अवघ्या तीन वर्षांचं अंतर असतानाही मोठ्या कौशल्यानं तिने अल्लू अर्जुनच्या ऑनस्क्रीन आईची भूमिका साकारली आहे. कल्पकता दोन मुलींची आई आहे. एका मुलाखतीत तिनं खुलासा केला होता की, ती अवघ्या १४ वर्षांची असताना तिचं लग्न झालं होतं.

दरम्यान कल्पकता सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. ती अनेकदा स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. जे पाहिल्यावर तिने एका आईची भूमिका साकारली आहे यावर विश्वास ठेवणं कठीण जातं.