बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. अमिताभ सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. या व्यतिरिक्त ते बऱ्याचवेळा त्यांचे विचार मांडताना किंवा चाहत्यांना शुभेच्छा देताना दिसतात. यावेळी अमिताभ यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सगळ्या चाहत्यांना शूभ सकाळ म्हणतं शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं असता अमिताभ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

अमिताभ यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून चाहत्यांना “प्रात: काल की शुभकामनाएँ !” म्हणजेच शुभ सकाळ म्हणतं शुभेच्छा देत एक पोस्ट शेअर केली आहे. यावर एका नेटकऱ्याने त्यांना “अबे बुढ्ढे दोपहर हो गयी” अशी कमेंट केली. ही कमेंट पाहिल्यानंतर अमिताभ यांनी शांतपणे त्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिले आहे. “आप चिर आयु हों, मेरी प्रार्थना, और ईश्वर करे तब आप को लज्जित करते हुए कोई भी आपको बुड्ढा न कहे!!”, अशी कमेंट करत अमिताभ यांनी नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिले आहे.

आणखी वाचा : लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये अमिताभ बच्चन यांना पाहून माधुरीचे पती डॉ नेने, म्हणाले “मी यांना…”

आणखी वाचा : मराठीतला आजवरचा सर्वात BOLD टीझर, तेजस्विनी पंडीतच्या ‘रानबाजार’ची झलक पाहिलीत का?

दरम्यान, अमिताभ यांचा ‘झुंड’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. ‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. तर लवकरच अमिताभ ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहेत.