बॉलिवूडचा नवाब म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे सैफ अली खान. सैफने १९९१ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यावेळी अभिनेत्री अमृता सिंह अतिशय लोकप्रिय होती. ती तिच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत होती. तिने २० वर्षांच्या सैफ अली खानशी लग्न केले होते. तिने एका मुलाखतीमध्ये करिअर तसेच खासगी आयुष्यावर वक्तव्य केले आहे.

राहुल रावैलच्या ‘बेखुदी’ या चित्रपटातून सैफ अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होता. या चित्रपटातून काजोलने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण सैफ अली खानच्या वागणूकीमुळे तिला चित्रपटातून बाहेर काढण्यात आले. त्याचवेळी सैफ आणि अमृता यांची पहिली भेट झाली. एका फोटोशूटसाठी ते एकत्र आले आणि त्यांच्यामध्ये मैत्री झाली. शूटनंतर सैफने अमृताला डिनर डेटसाठी विचारले होते. पण अमृताने सैफला नकार दिला होता.
Video: अजय-अतुलचे म्युझिक आणि बिग बींची एण्ट्री; नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’चा टीझर प्रदर्शित

सैफने सिमी ग्रेवालला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तो अमृता सिंहच्या घरी बरेच दिवस राहत होता असा खुलासा केला होता. त्यानंतर ते दोघे अनेक ठिकाणी कपल म्हणून फिरु लागले. एक दिवस सैफला शूटिंगसाठी बाहेर जायचे होते. त्यावेळी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याने अमृताकडून १०० रुपये उधार घेतले आणि तो शूटसाठी गेला. अमृताने सैफला तिची गाडी घेऊन जाण्यास सांगितले होते पण प्रोडक्शन हाउसने गाडी पाठवल्यामुळे त्याने नकार दिला.

सिमी ग्रेवालच्या शोमध्ये अमृता सिंह म्हणाली होती, ‘सैफ माझ्या घरी दोन दिवस राहिला होता. त्याला शुटिंगसाठी जायचे होते. त्याने माझ्याकडे १०० रुपये मागितले. कारण त्याच्याकड पैसे नव्हते. मी त्याला माझी गाडी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. पण त्याने प्रोडक्शनची गाडी असल्याचे सांगितले.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमृता आणि सैफने १९९१ साली लग्न केले होते. पण सतत होणाऱ्या भांडणांमुळे त्यांनी २००४ साली घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. सैफ आणि अमृताला दोन मुले आहेत. सारा अली खान आणि इब्राहिम अली खान. साराने ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्यानंतर तिने एका पाठोपाठ एक अशा हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.