अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) सध्या तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे. तिने या दिवसांमध्ये खास फोटोशूट देखील केलं. लंडनमध्ये सोनमच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लंडनमध्ये पार पडलेला हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सोनमसाठी अगदी खास होता. आता अभिनेते अनिल कपूर आपल्या लेकीसाठी ग्रँड पार्टीचं आयोजन करणार आहेत.

आणखी वाचा – “अजूनही शिकतोय, धडपडतोय पण…”; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावची पोस्ट चर्चेत

लंडनमध्ये सोनमचा पती आनंद आहुजाने डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सोनम-आनंदच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. आता सोनमच्या वडिलांना आपल्या लेकीसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. म्हणूनच त्यांनी लेकीसाठी ग्रँड पार्टी करण्याचं ठरवलं आहे. ही पार्टी सोनमच्या मावशीच्या बंगल्यावर आयोजित करण्यात येईल.

पिंकविलाच्या वृत्तानुसार, या आठवड्यामध्ये अनिल आणि सुनिता कपूर यांनी ही पार्टी करण्याचं ठरवलं आहे. त्याचबरोबरीने बॉलिवूडमधील कलाकारमंडळी देखील या पार्टीसाठी हजेरी लावणार आहेत. स्वरा भास्कर, करीना कपूर खान, अमृता अरोरा, आलिया भट्ट, नताशा दलाल, जॅकलीन फर्नांडिस, दीपिका पदुकोण, मसाबा गुप्ता, राणी मुखर्जी आदी कलाकार अनिल यांनी आयोजित केलेल्या या पार्टीला उपस्थित राहतील.

आणखी वाचा – राणादा-पाठकबाईंची लग्नापूर्वी लंडन ट्रिप, प्रेमात आकंठ बुडालेल्या सेलिब्रिटी कपलची चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवाय जान्हवी कपूर, अंशुला कपूर अर्जुन कपूर, शनाया कपूर ही घरातील मंडळीही अनिल आणि सुनिता कपूर यांच्या आनंदामध्ये सहभागी होणार आहेत. सोनम गरोदरपणातील सुंदर दिवस सध्या एण्जॉय करताना दिसत आहे.