बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. ते बऱ्याचवेळा त्यांच्या आईचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. यावेळी देखील त्यांनी आईचा असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अनुपम यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अनुपम त्यांच्या आईला विचारतात की त्या गंजू पटेल म्हणून त्यांना हाक का मारतात? त्यावर त्यांची आई मजेशीर उत्तर देत म्हणताता तू जन्मात टकला होतास. हा व्हिडीओ शेअर करत “आई मला सतत गंजू पटेल म्हणून हाक मारयची, पण ती असं का बोलते असा प्रश्न शेवटी मी तिला विचारला. सहानुभूतीदेत उत्तर देण्या ऐवजी, आईला मला तिचा तळहात दाखवलू आणि खरं कारण सांगत सत्याचा सानमा करून दिला! आणि नंतर माझ्या लहानपणाच्या काही गोष्टी सांगितल्या. सगळे हसले! जाऊ द्या! तुम्ही पण हसाल!”, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

आणखी वाचा : ‘टिप टिप बरसा पाणी’ गाण्याच्या रिमेकमध्ये कतरिनाला पाहून रवीना म्हणाली…

आणखी वाचा : “आपण हिंदू की मुस्लीम?” आर्यन, सुहानाच्या प्रश्नावर शाहरुखने दिले होते ‘हे’ उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अनुपम सध्या सूरज बडजात्या यांचा आगामी चित्रपट ‘उंचाई’च्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. या चित्रपटात अनुपम यांच्या व्यतिरिक्त परिणीती चोप्रा, बोमन इराणी, अमिताभ बच्चन, नीना गुप्ता, सारिका आणि डॅनी डेन्झोंगपा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.