काल संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये भव्य अशा शोभायात्रा काढण्यात आल्या. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह होता. या सणाचे प्रामुख्याने महाराष्ट्रात विशेष महत्व आहे. या सणानिमित्त अनेक घरांमध्ये खास पारंपरिक मराठमोळे पदार्थ बनवण्यात आले. याच पदार्थांची भुरळ आता बॉलिवूडच्या अभिनेत्रीलादेखील पडली आहे.
वडापाव, मिसळ यांसारख्या मराठमोळ्या पदार्थांच्या प्रेमात बॉलिवूडकर आहेतच मात्र अस्सल पारंपरिक पदार्थदेखील तितकेच आवडतात. अभिनेत्री अनुष्का शर्माच्या आईने तिच्यासाठी खास मराठमोळे पदार्थ बनवले आहेत. ज्यात बटाट्याची भाजी, पुरण पोळी, भात, आमटी लोणचं असा फक्कड मेनू बनवला होता. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत ही माहिती दिली आहे. तिने लिहले आहे “माझ्या आईने महाराष्ट्रीयन पदार्थ बनविण्याचा प्रयत्न केला आहे. हॅप्पी गुढीपाडवा” असा कॅप्शन दिला आहे.
दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये अनुष्काने आपले स्थान निर्माण केले आहे. तिचा चाहतावर्ग मोठा आहे. अनुष्का सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. आगामी चित्रपट, नवे प्रोजेक्ट याबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही अनुष्का चाहत्यांना माहिती देत असते. तसेच फिटनेसबाबतीत ही जागरूक आहे.
-
anushka
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
‘रब ने बना दी जोडी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अनुष्का शर्माने एक सो एक हिट चित्रपट दिले. २०१७ मध्ये अनुष्काने क्रिकेटर विराट कोहलीशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. ११ जानेवारी २०२१ मध्ये अनुष्काने गोंडस मुलीला जन्म दिला. अनुष्का व विराटच्या मुलीचे नावं वामिका असं आहे.