बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानीच्या प्रेमप्रकरणाची सध्या बॉलीवूड वर्तुळात जोरदार चर्चा आहे. या रिलेशनशिपबद्दल दोघांनी जरी उघडपणे वाच्यता केली नसली तरी अनेकदा या दोघांना एकत्र हँगआऊट करताना पाहिलं गेलं आहे. दोघंही आता लिव्ह- इनमध्ये राहणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळतेय. दिशा वांद्रे इथल्या नव्या घरात नुकतीच राहायला गेली आहे. याच घरात टायगर आणि दिशा एकत्र राहणार असल्याचं म्हटलं जात आहे.
टायगरशी सल्लामसलत केल्यानंतरच दिशाने वांद्रे इथं नवीन घर घेतलं. दोघांचाही लिव्ह-इनमध्ये राहण्याचा विचार असल्यानेच हे नवीन घर घेतल्याचं म्हटलं जात आहे. एकीकडे सोशल मीडियावर या सर्व चर्चा असतानाच टायगरची आई आएशा श्रॉफ यांचं मात्र काही वेगळंच म्हणणं आहे. ‘स्पॉटबॉय इ’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की, ‘टायगरचा लिव्ह-इनमध्ये राहण्याचा कोणताच विचार नाही.’ अस असल तरी, काही दिवसांपूर्वी टायगरला दिशाच्या नवीन फ्लॅटजवळ पाहिलं गेलं होतं.
वाचा : ‘न्यूटन’च्या ऑस्कर एण्ट्रीमुळे प्रियांका नाराज?
यापूर्वी एका मुलाखतीत दिशाबद्दल टायगरला विचारले असता तो म्हणाला की, ‘आमच्या नात्याबद्दल स्पष्टीकरण देण्याची गरज नाही वाटत. पण हो, तिच्यासोबत वेळ घालवणं मला खूप आवडतं. आमच्या आवडीनिवडी सारख्याच आहेत.’ हे दोघेही आगामी ‘बागी २’ या चित्रपटात एकत्र काम करणार असून या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात झाली आहे.