scorecardresearch

फ्लॅशबॅक : अन् गोरी गोरी पारू…

फरहाने गाण्याचे बोल व मुड पटकन पकडला.

फ्लॅशबॅक : अन् गोरी गोरी पारू…

dilip thakurआज मराठी चित्रपट देखिल ही ‘पोर साजुक…’ अथवा ‘बलम पिचकारी…’ अशा मसालेदार आयटम नृत्यगीतामध्ये रमलाय. पण २५-२६ वर्षापूर्वी असे एखादे सळसळते वा धमाकेदार गीत-नृत्य व तेदेखील हिंदीतील स्पष्टवक्ती म्हणून इमेजवाल्या फराहवर? चित्रपटाचा निर्माताच जर हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अँक्शन दिग्दर्शक असेल तर ते शक्य आहेच. अशा राम शेट्टीने ‘बलिदान’ चित्रपटाची निर्मिती करताना विनय लाडकडे दिग्दर्शन सोपवले व दारूच्या गुत्यावरील गीत नृत्याची संधी येताच फराहला मराठीत आणले. त्याच्या ‘खतरनाक’ या हिंदी चित्रपटात ती तेव्हा संजय दत्तची नायिका होती. चित्रनगरीत गुत्ता सेट लागला. अशोक सराफ वेगळ्या गेटअपमध्ये होता व फराहचे नृत्य म्हणून आम्हा सिनेपत्रकाराना सेटवरही बोलावले. ‘सोनेरी दारू अन गोरी गोरी पारू…’ हा गाण्याचा मुखडा त्या काळात थोडा धाडसी वाटला. विवेक आपटेचे गीत व अनिल मोहिले यांचे संगीत होते. फरहाने गाण्याचे बोल व मुड पटकन पकडला. म्हणून तर दोन दिवसात चित्रीकरण संपले.हिंदीतील पाहुणी मराठीत म्हटल्यावर सेटवर काही वेगळाच फिल येतो हे यावेळीही जाणवले पण त्याचे उत्तर कधीच शोधायचे नसते….

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-05-2016 at 01:05 IST

संबंधित बातम्या