‘भाभी जी घर पर हैं’ फेम मनमोहन तिवारीने आई बनून मुलीच्या कानशिलात लगावली; व्हिडीओ होतोय व्हायरल

अभिनेता रोहिताश यांनी एक नवा व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये ते आपल्या मुलीच्या कानशिलात लगावताना दिसून येत आहेत.

ROHITASH-850x550

‘भाभी जी घर पर हैं’ फेम मनमोहन तिवारीची भूमिका साकारणारे अभिनेते रोहिताश गौर त्यांच्या सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. अभिनेते रोहिताश गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या मुलीसोबतचे व्हिडीओ शेअर करताना दिसून येत आहेत. अभिनेता रोहिताश यांनी एक नवा व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये ते आपल्या मुलीच्या कानशिलात लगावताना दिसून येत आहेत.

अभिनेता रोहिताश यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओच्या सुरूवातीला त्यांची मोठी मुलगी गीती दिसून येते. यामध्ये गीती तिची लहान बहिण संजीती गौर हिच्यासोबत फोनवर बोलत असते. इतक्यात रोहिताश आई बनून एन्ट्री करतात आणि मुलगी संजीतीच्या कानशिलात लगावतात. अभिनेता रोहिताश यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर फॅन्स मोठ्या प्रमाणात कमेंट्स करताना दिसून येत आहेत. ‘आज बच्चोने मम्मी बना दिया’ असं म्हणत त्यांनी मुलीसोबतचा हा व्हिडीओ शेअर केलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohitashv Gour (@rohitashvgour)

अभिनेता रोहिताश यांनी शेअर केलेला व्हिडीओ त्यांचे फॅन्स खूपच एन्जॉय करत आहेत. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर काही तासांतच ३३ हजार पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. तसंच साडे पाच हजारपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक्स दिले आहेत. नेहमीच टीव्हीवर विनोदांनी लोकांचं मनोरंजन करत असतानाच सोशल मीडियावरील नेटकरी मंडळींना त्यांचा हा फनी अंदाज पहायला मिळाला.

रोहिताश गौरची मुलगी गीती गौर खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. ती सुद्धा तिच्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. गीतीचं सोशल मीडियावर पाहिलं असता तिला अभिनयात रस असल्याचं लक्षात येतं. ती तिच्या मोकळ्या वेळेत इन्स्टाग्रामवर वेगवेगळे रील्स बनवत असते. तसंच तिचे वेगवेगळे डान्सचे व्हिडीओ सुद्धा शेअर करत असते.

रोहिताश यांची मोठी मुलगी गीती ही एक मॉडेल सुद्धा आहे आणि तिने मॉडेलिंगमध्ये आपले पाय रोवायला सुरूवात देखील केलीय. तिने २०१९ मध्ये टाइम्स फ्रेश फेसच्या स्पर्धेत सेकंड रनरचा खिताब प्राप्त केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bhabi ji ghar par hai fame manmohan tiwari aka rohitashv gour shared video with daughter prp

ताज्या बातम्या