छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय शो ‘बिग बॉस मराठी’ चा नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘अनलॉक एंटरटेनमेंट’ ही टॅगलाइन घेऊन हा शो आता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय. या तिसऱ्या सिझनमध्ये प्रेक्षकांना कोणते नवीन चेहरे दिसणार?, यंदा काय वेगळं असेल?, यंदाचं घर कसं असेल? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेच असतील. यंदाचा ‘बिग बॉस मराठी’ तुमच्या अपेक्षा पेक्षा जास्त ग्रँड असणार आहे.
१९ सप्टेंबरपासून ‘बिग बॉस मराठी’ शो चाहत्यांच्या भेटाला येणार आहे. स्पर्धकांचा दिवसभरातील दिनक्रम, त्यांच्यातील संवाद, भांडणं आणि अनेक गोष्टी आपल्याला एका तासाच्या भागात पाहाता येणार आहेतच. त्याशिवाय यंदाचा सिझन प्रेक्षकांसाठी आणखी एक सरप्राइज घेऊन आलाय. हे सरप्राइज म्हणजे ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सर्व घडमोडी चोविस तास पाहता येणार आहे. वूटवर चोविस तास बिग बॉस मराठीचं लाइव्ह स्ट्रिमिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे आता स्पर्धकांवर २४ तास प्रेक्षकांची नजर राहणार आहे.
हे देखील वाचा: प्रसिद्ध गायकाला डेट करत असल्याच्या चर्चांवर अखेर आर्या आंबेकरने सोडलं मौन, म्हणाली…
View this post on Instagram
प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी बिग बॉसचं घर सज्ज झालं आहे. ‘बिग बॉस मराठी’ च्या तिसर्या सिझनचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार आहेत. त्यांचे अनेक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कोविड नियमांचे पालन करत घरात येणाऱ्या स्पर्धकांना क्वारंनटाईन करण्यात येणार आहे आणि प्रत्येक स्पर्धकांची टेस्ट देखील केली जाईल.