‘बिग बॉस १९’चा २८ सप्टेंबर रोजी होणारा ‘वीकेंड का वार’ हा भाग ब्लॉकबस्टर ठरणार आहे. वरुण धवन आणि जान्हवी कपूर ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी येणार आहेत. तर, अभिषेक मल्हान आणि हर्ष गुजरालदेखील दिसतील. ते सर्व सलमानबरोबर धमाल करताना दिसतील. सलमान बिग बॉसच्या सेटवर वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांना चिडवतानाही दिसणार आहे.

एकंदरीत हा ‘वीकेंड का वार’ खूपच धमाकेदार असणार आहे. निर्मात्यांनी प्रसिद्ध केलेल्या ‘बिग बॉस १९’च्या प्रोमोमध्ये याची झलक पाहता येईल. मनीष पॉलदेखील बऱ्याच काळानंतर ‘बिग बॉस’मध्ये दिसणार आहे आणि तो त्याच्या शायरीने स्पर्धकांची खिल्ली उडविताना दिसत आहे.

सलमानने वरुण-जान्हवीच्या डान्सची खिल्ली उडवली

या प्रोमोमध्ये वरुण धवन, रोहित सराफ व जान्हवीची एन्ट्री दाखवण्यात आली आहे. तिघेही सलमानबरोबर चित्रपटाच्या शीर्षकगीतावर नाचतात. सलमान नृत्याच्या चालींची खिल्ली उडवत म्हणतो, “तुमच्या नृत्यदिग्दर्शकानं तुमच्या प्रतिभेच्या आधारे तुम्हाला या स्टेप्स दिल्या का? मी तुमच्यापेक्षा चांगले नाचू शकतो.”

त्यानंतर वरुण धवन आणि मनीष पॉल घरातील सदस्यांना त्यांच्या शायरीतून एकमेकांना कडक उत्तरे देण्याचे टास्क देतात. अमाल मलिक, नेहल, प्रणीत व आवेज दरबारवर शायरी बनवतात. दरम्यान, मृदुल तिवारी तान्यावर शायरी बनवून कडक उत्तरे देतो आणि सर्वांना हसवतो. त्यानंतर हर्ष गुजराल तान्या मित्तलवर असा विनोद करतो की, सलमान खानही हसायला लागतो.

हर्ष म्हणतो, “माझी आई मिस इंडिया राहिली आहे. माझ्या तीन बहिणी मिस युनिव्हर्स राहिल्या आहेत…” हे ऐकून अभिषेक मल्हान त्याला थांबवतो आणि म्हणतो, “भाऊ, तू किती फेकशील?” त्यावर हर्ष म्हणतो की, मी कितीही फेकले तरी मी तान्या मित्तलपेक्षा जास्त फेकू शकत नाही. आज (२८ सप्टेंबर) एका स्पर्धकाला बाहेर काढण्यात येणार आहे. आवेज दरबारला ‘बिग बॉस १९’मधून बाहेर काढण्यात आल्याचे वृत्त आहे.