छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ हा वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. सध्या या शोचे ३ रे पर्व सुरु आहे. काहि दिवसांपूर्वी सुरु झालेल्या या शोमध्ये एवढ्यातच स्पर्धकांचे गृप झाले आहेत. काल प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एक टास्क रंगला. त्यासाठी बिग बॉसने स्पर्धकांना दोन ग्रुपमध्ये विभागले. बिग बॉसने सांगितलेल्या त्या टास्क संदर्भात विकास त्याच मत मांडताना दिसणार आहे.

आजच्या भागात विकास हा मीनल, आविष्कार, विशाल आणि सोनालीला सांगणार आहे की, “मी आज दिवसभर उत्कर्षचं निरीक्षण केल त्या विषयी मला सांगायचं आहे. पहिला टास्क जेव्हा झाला तेव्हा त्याचं असं होतं, की मी त्यांची मडकी फोडणार. आता मला असं वाटतं की तो कोणत्याही गोष्टीला क्रिएटिव्हली करण्यापेक्षा त्याचा नाश करण्यावर भर देतो. त्याने तर याचा विचारही केला नाही की आपल्याला आपली मडकी कशी वाचवता येतील. त्याला फक्त समोरच्यांची मडकी फोडायची एवढंच असतं,” असे विकास बोलतो.

आणखी वाचा : “उमेश माझा जुनाच गडी पण…”; लग्नाच्या दहाव्या वाढदिवसानिमित्त प्रियाचा खास उखाणा

दुसरी गोष्ट म्हणजे, “तो फक्त बडबड करतो की मी असं करेन, तसं करेन. मला तर महेश सर सुद्धा बोलले की मी हुशार आहे उगीच नाही बोलले. बघ आता मी काय करतो, असं तो तृप्ती ताईंना सांगत होता. खरं सांगायचं झालं तर उत्कर्ष हा बोलबच्चन आहे आणि त्याची मानसिक आणि शारिरीक क्षमता ही काहीच नाहीये,” असे विकास बोलतो.

आणखी वाचा : NCB च्या कोठडीत असणाऱ्या आर्यनसाठी McD चे बर्गर घेऊन पोहोचली गौरी खान पण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजच्या भागात बिग बॉस सदस्यांना काही कोडी देणार आहेत आणि त्यांना त्याची उत्तर शोधायची आहेत. आता या टास्कमध्ये कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. ‘बिग बॉस मराठी ३’ दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर पाहता येणार आहे.