छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ हा शो लोकप्रिय शोपैकी एक आहे. सध्या ‘बिग बॉस मराठी’चे ३ पर्व सुरु आहे. ‘बिग बॉस मराठी’ सुरु झाल्यापासून प्रेक्षकांना सतत स्पर्धकांमध्ये वाद पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे या आठवड्यातील बिग बॉसची चावडी पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुक आहेत. या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार? कोण सुरक्षित असणार? याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.

नुकतंच इन्स्टाग्रामवर बिग बॉसचा एक प्रोमो समोर आला आहे. यात महेश मांजरेकर हे सुरक्षित सदस्याचे नाव जाहीर करत असतात. त्याचवेळी सलमान खान हा बिग बॉसच्या मंचावर एंट्री करतो. यानंतर तो महेश मांजेरकरांना म्हणतो, “भाऊ अंतिम निकाल तर माझ्याकडे आहे. जे दोन स्पर्धक सुरक्षित आहे त्यांचे नाव आहे…” असे सांगत तो ते पॉकेट उघडताना दिसत आहे. हा सर्व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा : हा तुझा नवरा आहे की कोणाला…”, सलमान खानने घेतला राखी सावंतवर संशय

यानंतर सलमान हा विकास आणि सोनाली हे दोघेही सुरक्षित असल्याचे सांगतो. तर दुसरीकडे दादूस म्हणजे संतोष चौधरी हे एलिमिनेट होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज दादूस हे बिग बॉसच्या घरातून स्पर्धकांसह इतर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकाराच्या मुलीचे झाले लग्न, फोटो व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरात बी टीममध्ये फूट पडत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सोनाली आणि मीनलमध्ये भांडण झालं. त्यांनतर विकास आणि विशालमध्ये भांडण झालं. यानंतर पुन्हा एकदा सोनाली आणि विकासमध्ये आणि सोनाली आणि विशालमध्ये भांडण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे घरातील मैत्रीची समीकरणे बदलताना दिसून येत आहेत. घरात आल्यापासून सोनाली आणि विशालमध्ये एक खास नातं निर्माण झालं होतं. हे दोघे सतत एकमेकांसाठी लढताना दिसून आले होते. मात्र नुकतंच त्यांच्यात झालेल्या तुफान राड्यामुळे चाहत्यांना प्रचंड धक्का बसला आहे.