scorecardresearch

बिग बींनी पुरवले सहकलाकारांच्या जीभेचे चोचले, सेटवर केली वडापावची सोय

आयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाच्या सेटवर कामाशिवायही मोकळ्या वेळात धमाल सुरु असल्याचं कळत आहे.

Brahmastra
ब्रह्मास्त्र, Brahmastra

सोशल मीडियाचा सध्याच्या घडीला अगदी पुरेपूर वापर करणारा सेलिब्रिटी कोण, असं विचारलं असता एक नाव लगेचच समोर येतं. ते नाव म्हणजे महानायक अमिताभ बच्चन यांचं. सध्याच्या घडीला बिग बी, बल्गेरियामध्ये ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहेत.

आयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाच्या सेटवर कामाशिवायही मोकळ्या वेळात धमाल सुरु असल्याचं कळत आहे. खुद्द बिग बींचं ट्विट पाहता ही गोष्ट लगेचच लक्षात येत आहे. अनेकदा आपण घरापासून किंवा आपल्या शहरापासून दूर असल्यावर सर्वाधिक आठवण येते ती म्हणजे तिथल्या खाद्यपदार्थांची. अशीच परिस्थिती ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवरही उदभवली असावी. कारण, बिग बींनी या चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी परदेशात थेट समोसा आणि वडापाव या पदार्थांची सोय केली असून त्यांच्या जीभेचे चोचले पुरवले आहेत.

वाचा : #WeWantSacredGames2 : ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सिझनसाठी नेटकरी आतूर

ट्विट करत त्यांनी याविषयीची माहिती दिली. ही आपल्यासाठी एक प्रकारची सुखद गोष्ट असल्याची भावनाही त्यांनी या ट्विटमधून व्यक्त केली. बिग बींचा हा अंदाज सेटवर काम करणाऱ्या प्रत्येकालाच आनंद देऊन गेला असणार यात शंका नाही. करण जोहरच्या ‘धर्मा प्रॉडक्शन’ची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटातून आलिया भट्ट, रणबीर कपूर, नागार्जुन, डिंपल कपाडिया ही कलाकार मंडळीही झळकणार आहेत. तगडी स्टारकास्ट असणारा हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, आता त्याच्या चित्रीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-07-2018 at 10:56 IST
ताज्या बातम्या