बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ही नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. दिशा पटानी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. ती नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतंच दिशाने एक बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोशूट दरम्यानचा एक व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात ती फारच सुंदर दिसत आहे.

दिशा पटानीने बुधवारी इन्स्टाग्रामवर एका फोटोशूटचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने पांढऱ्या रंगाचा मिनी ड्रेस परिधान केला आहे. तिचा हा ड्रेस फारच सुंदर असून ती यात ग्लॅमरस दिसत आहे. हा मिनी ड्रेस परिधान करुन तिने विविध पोजमध्ये फोटोशूट केले आहे. यादरम्यानचा हा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. ‘अॅब्स्यूलेट स्मोक शो’, असे हटके कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे. त्यासोबतच तिने कॅप्शनमध्ये फायर इमोजीचा वापर केला आहे. अवघ्या काही तासातच तिच्या या व्हिडीओला ७ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

दिशा पटानी तिच्या हॉट, बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. दिशा काही दिवसांपूर्वी व्यस्त कामातून वेळ काढत मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत होती. त्यावेळी तिने मालदिवच्या समुद्रकिनाऱ्यावर बिकिनी घालून अनेक फोटो पोस्ट केले आहेत. यावेळी तिने बिकिनी घालून काही व्हिडीओही पोस्ट केले होते. त्यावेळी तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजावर नेटकरी फिदा झाले होते.

दिशा सलमान खानसोबत ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ मध्ये महत्वाची भूमिका साकारली होती. लवकरच ती अर्जुन कपूर , तारा सुतारीया आणि जॉन अब्राहम यांची प्रमुख भूमिका असलेला ‘एक विलन २’ या चित्रपटात झळकणार आहे.

दरम्यान दिशा पटानी आणि अभिनेता टायगर श्रॉफ सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेतील कपल आहे. ते दोघे नेहमी डिनर डेट किंवा लंचसाठी एकत्र जाताना दिसत असतात. मात्र दोघांनी त्यांच्या नात्याची अद्याप कबुली दिलेली नाही. बी टाऊनमधील हे हॉट कपल लवकरच ‘बागी ३’ चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.