अभिनेत्री जया बच्चन या कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. पापाराझींवर चिडतानाचे, त्यांच्यावर भडकतानाचे अनेक फोटो व्हायरल होताना दिसतात. नुकताच जया बच्चन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत त्या फोटो काढणाऱ्यावर संतापल्याचे दिसत आहे. यावरुन त्यांना ट्रोल केले जात आहे.

नेमकं काय घडलं?

जया बच्चन या त्यांचे पती अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबरोबर इंदौरला गेल्या होत्या. यावेळी विमानतळावर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांना पाहण्यासाठी गर्दी जमली होती. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचे मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले. यावेळी एक व्यक्ती जया बच्चन यांचे फोटो-व्हिडीओ काढत होता. त्या व्यक्तीला फोटो काढताना पाहिल्यानंतर जया बच्चन संतापल्या. यावेळी जया बच्चन यांनी ‘कृपया माझे फोटो काढू नका’, असे दोनदा रागात त्या व्यक्तीला सुनावले.
आणखी वाचा : Video : “या लोकांना…” जया बच्चन पुन्हा एकदा फोटोग्राफर्सवर संतापल्या

मात्र त्या व्यक्तीने कॅमेरा सुरु ठेवल्याने त्या चांगल्याच संतापल्या. ‘तुम्हाला इंग्रजी कळत नाही का?’ अशा शब्दात जया बच्चन यांनी संताप व्यक्त केला. यानंतर त्यांच्या एक व्यक्ती व्हिडीओ काढणाऱ्या त्या व्यक्तीला बाजूला करते आणि ती व्यक्ती, ‘तुला व्हिडीओ काढू नको असं सांगितलं होतं ना’, असे त्याला सांगताना दिसते. याच दरम्यान जया बच्चन या संतापलेल्या स्वरात म्हणतात की ‘या अशा लोकांना नोकरीवरुन काढून टाकायला हवं.’

ही घटना घडल्यानंतर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोलही केले आहे. “यांचा फोटो कोणाला बघायचा आहे”, असा प्रश्न एका नेटकऱ्याने व्हिडीओच्या खाली विचारला आहे. तर एकाने “बिचारे अमिताभ बच्चन यांना कसं सहन करत असतील”, अशी कमेंट केली आहे. “माझ्या प्रिय मित्रांनो कृपया या बाईकडे लक्ष देऊ नका. हिच्यापेक्षा तुम्ही कोणत्यातरी गरीबाचे फोटो शेअर करा, ते पाहायला आम्हाला आवडतील”, असा सल्ला एका नेटकऱ्याने दिला आहे.

आणखी वाचा : “तुम्ही मोठ्या आहात म्हणून…” जया बच्चन यांचं ‘ते’ कृत्य पाहून उर्फी जावेद भडकली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान जया बच्चन लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात दिसणार आहेत. करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करत आहे. यात आलिया भट्ट, रणवीर सिंग, धर्मेंद्र, शबाना आझमी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत