आपल्या देशात विविध प्रकारचे पक्षी प्राणी बघायला मिळतात. वाढत्या शहरीकरणामुळे जंगले नाहीशी होताना दिसून येत आहेत. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय वन उद्यानातं सकाळी ११.३० च्या सुमारास लीव्हर खेचून तीन चित्ते उद्यानात सोडले. १९५२ मध्ये चित्ता भारतातून नामशेष झाले होते. आता पुन्हा एकदा भारतात चित्ते दिसणार आहेत. आजवर बॉलिवूडमध्ये वाघ, सिंह असे प्राणी चित्रपटांमध्ये दाखवले गेले आहेत. मात्र चित्ता हा प्राणी कधी दिसण्यात आला नाही. बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीने मात्र खऱ्याखुऱ्या चित्त्यासोबतचा फोटो शेअर केला होता.

अभिनेत्री करिष्मा कपूर गेली अनेक वर्ष सिनेसृष्टीत कार्यरत आहे. दोन वर्षांपूर्वी करिष्माने चित्यासोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये चित्ता गाडीच्या बोनेटवर उभा आहे तर करिष्मा कपूर घाबरलेली दिसत आहे. तिने या फोटोला कॅप्शन दिला आहे की, ‘या फोटोत कोणतेही व्हीएफएक्स नाही अथवा कॉम्पुटरने एडिट केलेले नाही. या फोटोत मी एका सुंदर चित्यासोबत आहे. अर्थात मी घाबरलेले होतेच. हा चित्रपट ओळखा बरं? अशा शब्दात तिने कॅप्शन लिहला आहे. चाहत्यांनी कंमेंट्समधून या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे’.

दाक्षिणात्य स्टार प्रभास आणि क्रिती करतायत एकमेकांना डेट, चर्चांना उधाण

करिश्माने शेअर केलेला फोटो हा २००० साली आलेल्या शिकारी चित्रपटातील आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण दक्षिण आफ्रिकेत करण्यात आले होते. या चित्रपटात तिच्याबरोबर गोविंदा,तब्बू हे कलाकारदेखील होते. ‘राजा हिंदुस्तानी’, ‘दिल तो पागल हैं’ सारखे एकाहून एक सरस हिट चित्रपट करिष्मा कपूरने दिले आहेत. करिष्मा कपूरचे आई वडीलदेखील अभिनय क्षेत्रात कार्यरत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करिश्मा कपूरचं याआधी दिल्लीतील व्यावसायिक संजय कपूर याच्याशी २००३ मध्ये लग्न झालं होतं. या लग्नापासून तिला मुलगी समायरा आणि मुलगा कियान अशी दोन मुलं आहेत. २०१४ मध्ये या दोघांचं नातं संपल्याचं जाहीर झालं आणि २०१६ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. करिश्मा कपूरने आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान यांसारख्या दिग्गज कलाकारांबरोबर काम केले आहे