बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखली जाते. ती अनेकदा लोकांसमोर आपलं मन मांडताना दिसते. स्वरा भास्कर सोशल मीडियावरदेखील सक्रीय असते. इतर वेळी तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे तिला ट्रोल केले जाते. वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येत असते, मात्र ती सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

स्वरा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर करत असते, नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे ज्यात ती एका व्यक्तीच्या खांद्यावर आहे मात्र ती व्यक्ती कोण आहे फोटोत दिसत नाही. हे प्रेम असू शकते,” स्वराने तिच्या पोस्टला कॅप्शन दिले. तिच्या या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Video : “पार्टीची नशा अजून…” आईबरोबर सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यावर न्यासा देवगण झाली ट्रोल

स्वराने फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी तिला भंडावून सोडले आहे. अनेकांनी एकच प्रश्न विचारला आहे की ‘बॉयफ्रेंड का?’ काहींना विश्वास होता की अभिनेत्री लवकरच तिच्या प्रेम जीवनाबद्दल काहीतरी शेअर करेल, अनेकांनी तिला शुभेच्छादेखील दिल्या आहेत. एकाने लिहले आहे “अभिनंदन, ही बातमी बघून आनंद झाला,” तर दुसऱ्याने लिहले, “तोंड लपवायची गरज नव्हती.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वरा भास्कर याआधी हिमांशू शर्माबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. ‘रांझणा’ चित्रपटाच्या सेटवर त्या दोघांची भेट झाली होती मात्र ते २०१९ साली वेगळे झाले. स्वराने स्वरा ‘वीरे दी वेडिंग’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘निल बट्टे सन्नाटा’ यांसारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचा भाग आहे. तर आता ती लवकरच ‘मीमांसा’ आणि ‘मिसेस फलानी’ या चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.