अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ ही जोडी बॉलिवूड लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. या जोडीचा चाहता वर्गही मोठा आहे. विकी-कतरिनाने आत्तापर्यंत एकत्र स्क्रीन शेअर केली नव्हती. त्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक होते. आता पहिल्यांदाच दोघेही ऑन स्क्रीन एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे चाहतेही सुखावले आहेत.

विकी-कतरिनाचे शूटिंग दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहेत. परंतु हे फोटो चित्रपटाच्या शूटिंगचे नसून एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यानचे आहेत. जाहिरातीसाठी त्यांनी फोटोशूटही केलं आहे. विकी-कतरिनाला एकत्र पाहून चाहत्यांनाही आनंद होत आहेत. अनेकांनी कमेंट करून त्यांना शुभेच्छा देत जाहिरातीच्या प्रतिक्षेत असल्याचं म्हटलं आहे. परंतु, विकी-कतरिनाला मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे.

हेही वाचा >> ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी राजामौली यांनी घेतले १० कोटी?, जाणून घ्या सत्य

बॉलिवूडमधील लोकप्रिय विकी-कतरिनाने डिसेंबर २०२१मध्ये लग्नगाठ बांधली. राजस्थानमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. त्यांच्या शाही लग्नसोहळ्याची बरीच चर्चा रंगली होती. विकी-कतरिना सोशल मीडिया अकाऊंटवरून एकमेकांप्रति असलेलं प्रेम फोटो आणि पोस्टच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसतात.

हेही वाचा >> Video : अनन्या पांडेने गायलं ‘ये काली काली…’ गाणं, आयुष्मान खुराणाचा भन्नाट डान्स पाहून नेटकरी म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कतरिनाने सध्या तिच्या आगामी ‘फोन बुथ’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतंच तिने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’ शोमध्येही हजेरी लावली. तर विकी कौशल मेघना गुलझार दिग्दर्शन करत असलेल्या ‘सॅम बहाद्दूर’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.