सिने’नॉलेज’ : नाना पाटेकर यांनी कोणत्या मालिकेत नथुराम गोडसेची भूमिका साकारली होती?

नानांची ही भूमिका अविस्मरणीय ठरली.

नाना पाटेकर

मराठी चित्रपटसृष्टीतील नटसम्राट म्हणजेच नाना पाटेकर. महाराष्ट्रातील मुरुड-जंजिरा येथे १ जानेवारी १९५१ रोजी नानांचा जन्म झाला. त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून प्रशिक्षण घेतले आहे. स्केचेस काढण्याची आवड असलेले नाना तेव्हा गुन्हेगारांच्या वर्णनावरून त्यांचे स्केच काढायचे. याचदरम्यान त्यांनी नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

वाचा : विवाहित पुरुषाशी कधीच लग्न करणार नव्हती श्रीदेवी, पण…

नाना पाटेकर यांनी ’गमन’ (१९७८) मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ही भूमिका इतकी छोटी होती की, ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत. पुढे आठ वर्षे नाना चित्रपटात मिळेल ती भूमिका करत राहिले. राज बब्बर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ’आज की आवाज’ चित्रपटात नाना सहकलाकाराच्या भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पडला तरी त्यातील नानांच्या कामाचे मोठे कौतुक झाले होते. एन.चंद्रा यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या ‘अंकुश’ चित्रपटात नानांनी साकारलेली भूमिका त्यांच्यासाठी यशस्वी ठरली. १९८६ मध्ये आलेल्या या चित्रपटात नानांनी एका सरळमार्गी पण बेकारीमुळे त्रस्त असलेल्या युवकाची भूमिका केली होती. नानांची ही भूमिका अविस्मरणीय ठरली. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट, नाटक आणि टेलिव्हिजन मालिकांमध्येही काम केले आहे. नानांनी एका ब्रिटिश टेलिव्हिजन सीरिजमध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारली होती. ती मालिका कोणती हे तुम्हाला ओळखायचे आहे.

वाचा : अरे, हा राणादा नव्हं!

प्रश्न – नाना पाटेकर यांनी कोणत्या मालिकेत नथुराम गोडसेची भूमिका साकारली होती?
१. लॉर्ड ऑल्टरिंचम : द लास्ट व्हाइसरॉय
२. लॉर्ड माउंटबॅटन : द लास्ट व्हाइसरॉय
३. लॉर्ड मिंटो : द लास्ट व्हाइसरॉय

नाना पाटेकर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासोबत ‘नाम फाउंडेशन’ या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना विशेष करून मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करतात.

गेल्या आठवड्यातील प्रश्नाचे उत्तर
या मराठी अभिनेत्रीचे नाव काय?
उत्तर – प्राजक्ता माळी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bollywood quiz in which television series nana patekar played nathuram godse character

ताज्या बातम्या