Aamir Khan eat 100 paans a day: आमिर खान हा बॉलीवूडमधील परफेक्शनिस्ट आहे. एखादी भूमिका साकारताना ती भूमिका सर्वोत्तम होण्यासाठी तो खूप मेहनत घेतो. विविध पैलूंचा विचार करतो.
एखाद्या सीनचे शूटिंग होण्यापूर्वी तो अनेकदा त्याचा सराव करतो. त्याच्याबरोबर काम करणारे कलाकार याबद्दल अनेकदा आठवणी सांगतात. काही दिवसांपूर्वीच सलमान खान आणि आमिर खानने जेव्हा टू मच विथ काजोल अँड ट्विंकल या शोमध्ये हजेरी लावली होती, त्यावेळी सलमान खानने आमिर खान एखाद्या शूटिंगवेळी खूप वेळा सराव करतो असे सांगितले.
आमिर खान काय म्हणालेला?
आमिर खान एका दिवसात १०० पानं खात असे. त्याला पान खाण्याचे व्यसन लागले होते असे नाही, तर एक भूमिका साकारताना ती सर्वोत्तम व्हावी म्हणून तो १०० पाने खात असे. हा किस्सा त्याच्या पीके या गाजलेल्या चित्रपटातील आहे.
२०१४ ला पीके हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आमिर खान व अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकांमध्ये दिसले होते. राजकुमार हिरानी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
या चित्रपटात आमिर खानचे पात्र दिवसभर पान चघळत असल्याचे पाहायला मिळते, त्यामुळे या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, दररोज तो पान खात असे. आमिर खानने स्वत:च हा किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता.
आमिर खानने एका मुलाखतीत सांगितले होते की, मी एका दिवसात १००-१०० पानं खात असे. शूटिंगच्या सेटवर माझ्याबरोबर एक पानवाला असे, तो मला पान बनवून देत असे. पानामुळे त्याचे ओठ लाल होत असत, तसेच त्याला सीनमध्ये पाहिजे होते; त्यामुळे तो दिवसभर पान खात असे.
आमिर खानने भूमिका उत्तम होण्यासाठी जरी पानं खाल्ली असली तरी त्याला त्याचा त्रास झाला. सतत पानं खाल्ल्याने त्याच्या तोंडात फोड उठले होते. मात्र, तरीही तो भूमिका उत्तम करण्यासाठी पानं खात असे.
अनुष्का शर्माने एका मुलाखतीत याबद्दल वक्तव्य केले होते. ती म्हणालेली की आमिर खान दिवसभर पान खात असे, ते पाहून मला वाईट वाटायचे. दरम्यान, चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे तर या चित्रपटाने ७०० कोटींहून अधिक कमाई केली होती.
