Ira Khan-Nupur Shikhare Wedding: आमिर खानची लेक आयरा खान व नुपूर शिखरेचं ३ जानेवारीला नोंदणी पद्धतीने लग्न झालं. त्यानंतर आता मोठ्या धुमधडाक्यात उदयपूरमध्ये पारंपरिक रितीरिवाजानुसार लग्न सोहळा पार पडणार आहे. आयरा व नुपूरसह दोन्ही कुटुंब उदयपूरला पोहोचले असून सध्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत.

७ जानेवारीला आयरा खान व नुपूर शिखरे यांच्यासाठी एक पार्टी आयोजित केली होती. ज्यामध्ये लाइव्ह म्युझिक पाहायला मिळालं. यावेळी सावत्र आई किरण रावसह अनेक कलाकारांनी आयरा व नुपूरसाठी खास परफॉर्मन्स केला. किरण रावने लेकासह परफॉर्मन्स केला होता. याचा व्हिडीओ समोर आला आहे.

हेही वाचा – लेकीचं टिकलीबाबत ते वाक्य ऐकून ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीचे कान झाले तृप्त, म्हणाली, “मेरा देश बदल रहा है…”

‘बॉलीवूड नाउ’ या इन्स्टाग्राम पेजवर किरण रावचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत एका बाजूला किरण राव आपल्या लेकाबरोबर परफॉर्मन्स करताना दिसत आहे. तर दुसऱ्याबाजूला सावत्र लेक आयरा होणाऱ्या नवऱ्याबरोबर डान्स करताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – “हा प्रसंग आमच्या सगळ्यांच्या मनावर कायमचा कोरला…”, प्रसाद ओकची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसंदर्भातील ‘ती’ पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आज आयरा-नुपूरचा मेहंदी सोहळा पार पडला आहे. उद्या, ९ जानेवारीला संगीत सोहळा होणार आहे. त्यानंतर १० जानेवारीला आयरा-नुपूर पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधणार आहेत. या लग्नसोहळ्यात जवळपास २५० पाहुणे सहभागी होणार आहेत. लग्नसोहळ्यासाठी ताज आरवली हॉटेलच्या १७६ खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. या लग्नसोहळ्यात सहभागी होणाऱ्या कोणत्याच पाहुण्यांकडून भेटवस्तू स्वीकारण्यास आयरा व नुपूरने नकार दिला आहे.