'आशिकी' चित्रपटामुळे रातोरात स्टार झालेला राहुल रॉय म्हणाला, "आशिकी ३ साठी कार्तिक आर्यनला..." | aashiqui first part actor rahul says it will be huge struggle for kartik aaryan for aashiqui 3 | Loksatta

‘आशिकी’ चित्रपटामुळे रातोरात स्टार झालेला राहुल रॉय म्हणाला, “आशिकी ३ साठी कार्तिक आर्यनला…”

कार्तिकबरोबर यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानादेखील झळकणार असल्याची शक्यता आहे.

‘आशिकी’ चित्रपटामुळे रातोरात स्टार झालेला राहुल रॉय म्हणाला, “आशिकी ३ साठी कार्तिक आर्यनला…”
राहुल रॉय कार्तिक आर्यन | rahul roy kartik aryan

‘आशिकी’ या १९९० साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील प्रेमकथा प्रेक्षकांना फारच भावली होती. या चित्रपटातील गाणीही अजरामर ठरली. आजही अनेकांच्या तोंडी चित्रपटातील गाणी ऐकायला मिळतात. २०१३ साली या चित्रपटाचा सिक्वेल म्हणजेच ‘आशिकी २’ प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील गाण्यांनीही प्रेक्षकांना वेडं लावलं होतं. चित्रपटातील आदित्य आणि श्रद्धाची जोडीही हिट ठरली होती.

आता लवकरच ‘आशिकी ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आशिकी ३’ चित्रपटात बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. कार्तिकबरोबर यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानादेखील झळकणार असल्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : वरुण धवनने केलं ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल वक्तव्यं; म्हणाला “यामुळे भारतीय चित्रपटांना…”

१९९० च्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता राहुल रॉयने यासंदर्भात भाष्य केलं आहे. ‘पिंकव्हीला’च्या मुलाखतीमध्ये राहुल म्हणाला, “या तिसऱ्या भागाचं सादरीकरण नावीन्यपूर्ण असेल यात काहीच शंका नाही. पण पहिल्या दोनही भागांच्या लकप्रियतेचं ओझं कार्तिकच्या खांद्यावर असणार हे नक्की. प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्याला यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे.”

असं म्हणत राहुल रॉयने कार्तिकला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. कार्तिकबद्दल राहुल म्हणाला, “कार्तिक हा एक उत्तम अभिनेता आहे, त्याला चांगल्या कथांची पारख करायला जमतं. मी आजवर कधीच त्याला भेटलेलो नाही. सध्या बॉक्स ऑफिसवरसुद्धा कार्तिकच्याच चित्रपटाची चलती आहे. त्यामुळे त्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.” कार्तिक आर्यनच्या ‘भूलभुलैया २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाल केली होती. कार्तिकच्या या आगामी ‘आशिकी ३’चं दिग्दर्शन अनुराग बासु करणार असून. हे दोघे यानिमित्ताने एकत्र काम करणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
बापू-बापू करत रडणाऱ्या ‘या’ पुढाऱ्याचा व्हायरल व्हिडीओ शेअर करत केआरके म्हणाला, “याला मी माझ्या…”

संबंधित बातम्या

“मला प्रीमियरला…” ‘दृश्यम २’ चित्रपटातील मराठमोळ्या अभिनेत्रीने व्यक्त केली खंत
१७ व्या वर्षी लग्न, अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध; तब्बल ३० वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये परतणार प्रसिद्ध अभिनेत्री
“…म्हणूनच आम्ही अलिबागमध्ये घर खरेदी केले” रणवीर सिंगने केला खुलासा
रस्त्यावरील छोट्या मुलीला पैसे दिल्यानंतर दुसरा मुलगाही काजोलच्या गाडीमागे धावला अन्…; पाहा व्हिडीओ
पदार्पणातच वयाने मोठ्या असणाऱ्या रेखांबरोबर शेखर सुमन यांनी दिला होता बोल्ड सीन; शूटिंग सुरु असतानाच…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
चीनमध्ये जनआंदोलनानंतर करोना निर्बंध शिथिल 
तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलता येणार नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
नेत्यांकडे स्वत:ची मते, व्यासंग असावा – देवेंद्र फडणवीस
गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
Maharashtra Karnataka border: एसटीच्या ३८२ फेऱ्या अंशत: रद्द