बहुप्रतीक्षित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट अखेर आज प्रदर्शित झाला आहे. गेले अनेक महिने या चित्रपटाचे सर्वजण आतुरतेने वाट बघत होते. दिग्दर्शक ओम राऊत याने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर या चित्रपटात प्रभास श्रीरामांच्या भूमिकेत दिसत आहे, क्रिती सेनॉन हिने सीतेची भूमिका साकारली आहे, आणि अभिनेता सनी सिंग या चित्रपटामध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारताना दिसत आहे. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटात हा हनुमानाच्या भूमिकेत दिसत आहे. आता या चित्रपटात लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या सनी सिंगने प्रभासबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता, हे सांगितलं आहे

‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या गाण्यांना आणि ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तर आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाबद्दल सर्वत्र संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अशातच सनी सिंगने प्रभास सेटवर त्याच्याबरोबर कसा वागायचा याचा खुलाचा केला आहे.

आणखी वाचा : “ते कधीच…,” देवदत्त नागेने सांगितला ‘आदिपुरुष’च्या निमित्ताने सैफ अली खान व प्रभासबरोबर काम करण्याचा अनुभव

‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत सनी म्हणाला, “‘आदिपुरुष’ हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे कारण या चित्रपटात मला प्रभासबरोबर काम करायला मिळालं. आता प्रभास हा मला माझ्या मोठ्या भावासारखा झाला आहे. पहिल्या दिवशीच आम्ही एकमेकांना कनेक्ट झालो. या चित्रपटात काही सीन्स करताना आम्ही दोघेही खरोखरच भावुक व्हायचो. कारण आम्हाला वाटायचं की आम्ही दोघं खरंच भाऊ आहोत आणि एका कठीण प्रसंगातून जात आहोत.”

हेही वाचा : हनुमानाच्या बाजूला बसून ‘आदिपुरुष’ पाहण्यासाठी मोजावी लागणार अधिक किंमत? जाणून घ्या काय असेल तिकिटाची किंमत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे त्यांनी सांगितलं, “काही वेळा आम्हाला सीनमध्ये कोणतेही डायलॉग नसायचे. त्यावेळी फक्त एकमेकांकडे पाहून आम्हाला व्यक्त व्हायचं होतं. ते सीन्स करणं आमच्यासाठी आव्हानात्मक होतं आणि त्यासाठी आम्हाला खूप कल्पना करावी लागायची. कारण आम्ही संपूर्ण शूटिंग एका खोलीमध्ये व्हीएफएक्स तंत्रज्ञान वापरून केलं आहे.” आता सनीचं हे बोलणं चर्चेत आलं आहे.