ऑक्टोबर महिना सुरु झाला आहे सगळीकडे दिवाळीची तयारी सुरु आहे मात्र वातावरण काही दिवस विचित्र आहे. गेले काही दिवस सर्वत्र पाऊस पडत आहे. सप्टेंबर महिन्यानंतर पाऊस थांबतो मात्र यावर्षी ऑक्टोबर महिन्यातदेखील मुसळधार पाऊस पडत आहे. पावसावरून सोशल मीडियावर अनके विनोद व्हायरल होत आहेत. पावसात सर्वात जास्त आनंदी होतात ती मुले मात्र आजकाल सगळ्याच वयोगटातील लोक पावसाचा आनंद घेतात. यात बॉलिवूड सेलिब्रेटीदेखील मागे नाहीत. अभिनेत्री करिष्मा कपूरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पावसात नाचतानाचा तिचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडला आहे.

या व्हिडीओमध्ये ती तिच्या ‘दिल तो पागल हैं’ चित्रपटातील चक चक धूम धूम या गाण्यावर नाचताना दिसत आहे. मूळ गाणे हे चित्रपटात शाहरुख खान, माधुरी दीक्षितवर चित्रित झाले होते. या चित्रपटात ती शाहरुख खान, माधुरी दीक्षितबरोबर झळकली होती. हा चित्रपट आणि यातील गाणी सुपरहिट ठरली होती. या चित्रपटाने तिला वेगळी ओळख मिळवून दिली होती. तिच्या या व्हिडीओवर हजारो प्रतिक्रिया आल्या आहेत. खुद्द माधुरीने स्माईलीमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ‘या’ फोटोतील कलाकारांना ओळखलंत का?

करिष्माने वयाच्या १६ वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. १९९१ साली ‘प्रेमकैदी’ चित्रपटातून तिने अभिनयाचा श्रीगणेशा केला होता. राजा हिंदुस्थानी’ हा तिचा गाजलेला चित्रपट होता. आजही तिच्या सौंदर्याने तिच्या चाहत्यांना घायाळ करत असते. सोशल मीडियावर ती कायमच सक्रिय असते. आपले फोटो ती शेअर करत असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकताच तिने एक क्रॉप टॉपमधला फोटो शेअर केला आहे. ज्यात ती खूपच तरुण दिसत आहे.करिष्मा कपूरने हा फोटो टाकताच नेटकऱ्यांनी कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे फक्त नेटकरी नव्हे तर बॉलिवूड सेलिब्रेटींनीदेखील तिच्या फ़ोटोंवर कॉमेंट्स करण्यात सुरवात केली आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या फोटोवर कॉमेंट केली आहे.