बॉलिवूडमधील लोकप्रिय विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या जोडीचे लाखो चाहते आहे. लग्नानंतरची पहिलीच करवा चौथ त्यांनी साजरी केली. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कतरिना त्यांच्या लग्नाबद्दल आणि विकीबरोबरच्या नात्याबद्दल नेहमीच उघडपणे बोलताना दिसतात. यावेळीही एका मुलाखतीत तिने विकी कौशलला पहिल्यांदा पाहिल्यानंतर काय वाटलं, याबद्दल भाष्य केलं.

कतरिना तिच्या आगामी ‘फोन बुथ’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतंच तिने ‘द इंडियन एक्सप्रेस’ला मुलाखत दिली. विकी कौशलला पहिल्यांदा ‘मनमर्जिया’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहिल्याचं कतरिनाने सांगितलं. ती म्हणाली, “मला आठवतंय, निर्माते आनंद राय यांनी मला ‘मनमर्जिया’ चित्रपटाचा ट्रेलर दाखवला होता. ट्रेलरमध्ये विकीला पाहून हा मुलगा कोण आहे?, असं मी त्यांना विचारलं होतं. तेव्हा मी विकीला पहिल्यांदा पाहिलं होतं. त्याचा सहस सुंदर अभिनय पाहून त्याच्या टॅलेंटची प्रचिती आली होती”.

हेही वाचा >> राजामौलींच्या चित्रपटात दीपिका पदुकोणची वर्णी? महेश बाबूसह पडद्यावर रोमान्स करणार असल्याच्या चर्चांना उधाण

हेही वाचा >> आलिया भट्ट गिरगावमधील ‘या’ रुग्णालयात देणार बाळाला जन्म

कतरिनाने या मुलाखतीत त्यांच्या लग्नाबद्दलही भाष्य केलं. “लग्न सोहळ्याचा समारंभ आणि ते दिवस फारच छान होते. सगळे आनंदी होते. सगळ्यांनी दिलेले आशीर्वाद आमच्याबरोबर आहेत”, असंही कतरिना म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कतरिनाचा ‘फोन बुथ’ हा हॉरर कॉमेडी चित्रपट येत्या ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कतरिना दुहेरी भूमिकेत दिसणार असल्याच्यादेखील चर्चा आहेत. गुरमीत सिंग दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता इशान खट्टर व सिद्धांत चतुर्वेदी कतरिनासह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.