ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ सिनेमा १६ जूनला सर्वत्र प्रदर्शित झाला. रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता होती. पहिल्याच दिवशी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहांत गर्दी केल्याचं दिसून आलं. परंतु, ‘आदिपुरुष’ प्रेक्षकांच्या फारसा पसंतीस उतरला नसल्याचं चित्र आहे. अनेकांनी या चित्रपटाला ट्रोल केलं आहे. रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचा मुलगा प्रेम सागर यांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटाबाबत भाष्य केलं आहे.

प्रेम सागर यांनी नुकतीच ‘हिंदुस्तान टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ‘आदिपुरुष’ सिनेमाची कथा, सिनेमॅटिक लिबर्टी, रावणाची भूमिका आणि चित्रपटातील संवाद यावर भाष्य केलं. ते म्हणाले, “मी चित्रपट पाहिलेला नाही. पण आदिपुरुषचा ट्रेलर व टीझर मी पाहिला आहे. रामानंद सागर यांनीही रामायणमध्ये क्रिएटिव्ह फ्रिडमचा वापर केला होता. पण राम त्यांनी श्री रामाला समजून घेतलं होतं. अनेक ग्रंथ वाचल्यानंतर त्यांनी छोटे-मोठे बदल केले. परंतु, सत्याशी छेडछाड कधीच केली नाही.”

हेही वाचा>> Adipurush : ५०० कोटींचं बजेट असलेला ‘आदिपुरुष’ प्रदर्शनाच्या दिवशीच ऑनलाइन झाला लीक, चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होणार का?

‘आदिपुरुष’ चित्रपटातील सैफ अली खानने साकारलेल्या रावणाच्या भूमिकेबाबत ते म्हणाले, “रावण एक विद्वान व बुद्धिवान मनुष्य होता. त्याला खलनायक म्हणून दाखवणं चुकीचं आहे. ग्रंथांनुसार, श्रीरामांच्या हातूनच मोक्ष मिळू शकतो, हे ठाऊक असल्यानेच रावणाने इतका विनाश केला. श्रीरामही रावणाला विद्वान मानायचे. जेव्हा रावणाचा मृत्यू होणार होता, तेव्हा श्रीरामांनी काहीतरी शिकवण मिळेल या उद्देशाने लक्ष्मणाला त्याच्या चरणाकडे जाण्यास सांगितले होते. त्यामुळेच तुम्ही रावणाला खलनायक म्हणून दाखवू शकत नाही.”

‘तेल तेरे बाप का, जलेगी तेरे बाप की’ या हनुमानाच्या तोंडी असलेल्या डायलॉगबद्दलही त्यांना मुलाखतीत विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना प्रेम सागर हसले आणि याचा टपोरी स्टाइल असा उल्लेख केला. ओम राऊतने ‘आदिपुरुष’ चित्रपट मार्वेल बनवण्याचा प्रयत्न केला, असंही ते म्हणाले.

हेही वाचा>> Video : हनुमानाच्या प्रतिमेची पूजा केली, प्रसाद म्हणून केळी दाखवली अन्…; ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या चित्रपटगृहातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेकांनी रामायण लिहिलं आहे पण कोणीच त्याच्या कथेत बदल नाही केला. केवळ रंग आणि भाषा बदलली. परंतु, ‘आदिपुरुष’मध्ये सत्यात फेरफार करण्यात आली आहे. रामायणवर वेब सीरिज बनवणार का? असंही त्यांना विचारण्यात आलं. यावर उत्तर देत ते म्हणाले, “८५ वर्षांपर्यंत असं रामायण कोणीही बनवू शकणार नाही, असं माझे वडील म्हणाले होते. त्यांनी लोकांना मर्यादा पुरुषोत्तमची कथा सांगितली.”