Aitraaz Sequel : सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता सुभाष घई यांनी २००४ मध्ये प्रदर्शित झालेला हिट चित्रपट ‘ऐतराज’च्या सिक्वेलची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव ‘ऐतराज २’ असणार आहे. ‘ऐतराज’ला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सुभाष घई यांनी या चित्रपटाची घोषणा केली. ‘ऐतराज’ हा रोमँटिक थ्रिलर चित्रपट होता, ज्यामध्ये अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा आणि करीना कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट १२ नोव्हेंबर २००४ रोजी प्रदर्शित झाला होता. अब्बास-मस्तान यांच्या जोडीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. मुक्ता आर्ट्स बॅनरखाली घई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती.

सुभाष घई यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करत माहिती दिली की, ‘ऐतराज २’ची कथा पूर्णपणे तयार आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले, “आता मुक्ता आर्ट्स ‘ऐतराज २’साठी पूर्णतः तयार आहे. तीन वर्षांच्या मेहनतीनंतर या उत्कृष्ट पटकथेची निर्मिती केली आहे. जस्ट वेट अँड वॉच,” असे त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे.

हेही वाचा…शाहरुख-सलमानची प्रमुख भूमिका, कौटुंबिक ड्रामा अन्…; ३० वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार ‘हा’ चित्रपट, हृतिक रोशनशी आहे खास कनेक्शन

घई यांनी आपल्या पोस्टमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या ‘ऐतराज’मधील सोनियाच्या भूमिकेच्या आठवणी सांगितल्या. प्रियांका ही भूमिका करण्यासाठी सुरुवातीला संकोच करत होती. सुभाष घई पुढे म्हणाले, “प्रियांका चोप्राने तिच्या अभिनयातून धाडस आणि सुंदरतेचे दर्शन घडवले. त्या पात्रातील तिची अदाकारी आज २० वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सुरुवातीला ती या भूमिकेसाठी संकोच करत होती, परंतु तिने आत्मविश्वासाने या पात्राला न्याय दिला.”

हेही वाचा…दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं कौतुक करत विद्या बालनने व्यक्त केली इच्छा; म्हणाली, “मला त्यांना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटात अमरीश पुरी, अन्नू कपूर, परेश रावल, उपासना सिंग आणि विवेक शौक यांनीदेखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. ‘ऐतराज’मध्ये प्रियांकाच्या अभिनयाची प्रेक्षक आणि समीक्षकांनी खूप प्रशंसा केली होती, ज्यामुळे ती चित्रपटसृष्टीत बरीच प्रसिद्ध झाली होती. या सिनेमात प्रियांकाने खलनायिकेचे पात्र साकारले होते. या चित्रपटामुळे तिला बॉलीवूडमध्ये खरी ओळख मिळाली होती, असे बोलले जाते.