अक्षय कुमार हा बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या चित्रपटांबरोबर असतो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे, त्याच्या वागणकीमुळे नेहमीच चर्चेत असतो. चित्रपटांव्यतिरिक्त तो अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसतो. पण आता अशाच एका कार्यक्रमामधील त्याच्या व्हायरल व्हिडीओमुळे नेटकरी त्याच्यावर संतापले आहेत.

गेल्या काही महिन्यात अक्षय कुमारचे प्रदर्शित झालेले जवळपास सर्वच चित्रपट फ्लॉप ठरले. त्याच्या या फ्लॉप ठरलेल्या चित्रपटांमुळे त्याचं मोठं नुकसान झालं. तर अशातच तो त्याच्या द एंटरटेनर्स या शोच्या टूरमध्ये सहभागी झालेला दिसला. या टूरदरम्यान अक्षयने मौनी रॉय, दिशा पटानी, सोनम बाजवा आणि नोरा फतेही यांच्याबरोबर स्टेजवर डान्स परफॉर्मन्सही दिला. पण या डान्समुळे तो चांगलाच ट्रोल होत आहे.

आणखी वाचा : “पैसा यांना काय काय करायला लावतो…” ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे सलमान खान व अक्षय कुमार ट्रोल

या टूरदरम्यानचा त्याचा एक व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय मौनी रॉय आणि सोनम बाजवाबरोबर ‘बलमा’ या गाण्यावर शर्टलेस होऊन थिरताना दिसत आहे. पण त्याचं असं शर्टलेस होऊन बेभान नाचणं अनेकांना खटकलं. त्यामुळे आता अक्षयवर नेटकरी जोरदार टीका करत आहेत.

हेही वाचा : “…तर चित्रपट पाहणार नाही”; ‘हेरा फेरी’च्या निर्मात्यांवर प्रेक्षक नाराज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिलं, ” तू ५९ वर्षाचा काका २३-२४ वर्षांच्या मुलींबरोबर असा नाचतो आहेस…तुला लाज वाटली पाहिजे.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “याला कोणीतरी कॅनडाला परत पाठवा.” तर आणखी एकाने लिहिलं, “तुझं वय काय आणि तू करतोस काय!” त्यामुळे आता हा डान्स अक्षयला महागात पडला आहे.