बॉलीवूडचे सुपस्टार अमिताभ बच्चन ११ ऑक्टोबरला आपला ८१ वा वाढदिवस साजरा करणार आहेत. अमिताभ यांच्याबरोबर त्यांच्या चाहत्यांसाठी हा वाढदिवस खास असणार आहे. वाढदिवसाअगोदर अमिताभ यांच्या आवडत्या वस्तूंची लिलाव करण्यात येणार आहे. चाहत्यांना त्या वस्तू खरेदी करता येणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया बिग बींच्या कोणत्या वस्तूंची निलामी होणार.

हेही वाचा- वडिलांच्या निधनाच्या दिवशी कुमार सानू यांनी दिलेला आयुष्यातील सर्वात बेस्ट परफॉर्मन्स; म्हणाले, “मी हास्य…”

अमिताभ बच्चन बॉलीवूडचे सुपस्टार मानले जातात. आपल्या अभिनयाबरोबर आपल्या अवाजाने त्यांनी आपल वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तब्बल ५ दशकांपासून ते बॉलीवूडवर राज्य करत आले आहेत. ११ ऑक्टोबरला अमिताभ बच्चन यांचा ८१ वा वाढदिवस आहे. हा वाढदिवस खास प्रकारे साजरा करण्यात येणार आहे. अमिताभ यांच्या वाढदिवासानिमित्त त्यांना आवडणाऱ्या अनेक वस्तूंची लिलाव करण्यात येणार आहे. ६ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत हा लिलाव करण्यात येणार आहे.

‘या’ वस्तूंची होणार लिलाव

या लिलावात अमिताभ बच्चन यांच्या ‘जंजीर’, ‘दीवार’, ‘फरार’ चित्रपटांचे शोकार्ड सेट, ‘शोले’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर रमेश सिप्पी यांनी दिलेल्या पार्टीतील काही खासगी फोटो, ‘मजबूर’ चित्रपटाचे अनसिन पोस्टर, मि. नटवरलाल’, ‘द ग्रेट गैम्बलर’, ‘कालिया’, ‘नसीब’, ‘सिलसिला’ चित्रपटातील आणि प्रसिद्ध फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांनी अमिताभ बच्चन यांचे शूट केलेले अनसिन स्टूडियो पोट्रेट या वस्तूंचा सहभाग आहे.

हेही वाचा- “ती राक्षसासारखी आहे,” विकी कौशलने पत्नी कतरिनाबद्दल केलं वक्तव्य; म्हणाला, “आम्ही दोघे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बच्चनेलिया’ या नावाने हा लिलावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून चाहत्यांना अमिताभ बच्चन यांचे न पाहिलेले फोटो आणि किस्से जाणून घेता येणार आहेत. ‘ऑक्शन रिवाज एंड आईव्स’ द्वारा या लिलावाचे आयोजन करण्यात येणार आहे.