देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, रिलायन्स इंडस्ट्रीज चेअरमन मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी यंदा राधिका मर्चंट हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहेत. जुलै महिन्यात दोघांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. त्याआधी नुकतंच अनंत-राधिका यांचा प्री-वेडिंग सोहळा मोठ्या जल्लोषात, थाटामाटात पार पडला. गुजरातमधील जामनरमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. १ मार्च ते ३ मार्चपर्यंत झालेल्या या प्री-वेडिंग सोहळ्याला अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहिले होते. हा सोहळा होऊन तीन दिवस झाले असले तरी चर्चा मात्र सुरुच आहे.

कोणी अंबानींनी केलेल्या खर्चाविषयी बोलतंय, कोणी सेलिब्रिटींच्या मानधनाविषयी बोलतंय, कोणी सोहळ्यातील फोटो, व्हिडीओविषयी बोलतंय, तर कोणी आक्षेप घेतंय. हे सध्या अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाविषयी सुरू आहे. अशातच आज आपण अनंत अंबानींच्या होणाऱ्या सासूबाई कोण आहेत? त्या काय काम करतात? हे जाणून घेणार आहोत.

हेही वाचा – अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी बॉलीवूडच्या तीन खानना किती मिळाले मानधन? जाणून घ्या…

फोटो सौजन्य – राधिका मर्चंट फॅन पेज

अनंत अंबानींची होणारी पत्नी राधिकाच्या वडिलांचं नाव वीरेन मर्चंट आहे. मुकेश अंबानींच्या दोन व्याह्यांप्रमाणेच हे देखील व्याही श्रीमंत आहेत. राधिकाचे वडील हेल्थकेअर कंपनी एनकोर (Encore)चे सीईओ आहेत. जवळपास त्यांची ७५० कोटींहून अधिक संपत्ती आहे. अनंत यांच्या होणाऱ्या सासूचं नाव शैला मर्चंट असं आहे. त्या एक बिझनेस वूमन असून एनकोर कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत.

हेही वाचा – काय म्हणता! अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटात ‘हा’ बॉलीवूड सुपरस्टार झळकणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधी शैला मर्चंट यांनी अनेक कंपन्यांमध्ये संचालक पदी काम केलं आहे. अथर्व इम्पेक्स प्राइवेट लिमिटेड, हवेली ट्रेडर्स प्राइवेट लिमिटेड आणि स्वास्तिक एक्जिम प्राइवेट लिमिटेड यांसारख्या कंपनीत त्यांनी काम केलं आहे. शैली यांनी ९०च्या दशकात करोडपती व्यावसायिक वीरेन मर्चंट यांच्याशी लग्न केलं. त्यानंतर वीरेन व शैला यांनी मिळून २०२२ साली एनकोर हेल्थकेअरची स्थापना केली होती. जवळपास २००० कोटींची एनकोर कंपनीच्या त्या एमडी आहेत. नेटवर्थबाबत बोलायचं झालं तर माहितीनुसार, राधिकाच्या आईचं नेटवर्थ १० कोटींचं आहे.