अरिजित सिंह हा बॉलीवूडमधील आघाडीचा गायक आहे. त्याचे असंख्य चाहते आहेत. सांवरिया’ चित्रपटातील गाण्यांनी करिअरची सुरुवात करणारा अरिजित सिंह ‘आशिकी-२’मधील गाण्यांनी रातोरात स्टार झाला. यानंतर अरिजितला रोमँटिक गाण्यांचा राजा म्हटले जाऊ लागले. चाहत्यांना वेड लावणारा अरिजित तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहे. आपल्या गाण्याबरोबरच अरिजितचे त्याच्या साध्या राहणीमानामुळे नेहमी कौतुक होते. सध्या अरिजित सिंहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून चाहते अरिजित सिंहचे कौतुक करत आहेत.

हेही वाचा- Video : “आता तिसरी बायको…”; आमिर खान आणि फातिमा शेखचा ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून चर्चांना उधाण

हा व्हिडीओ अरिजितच्या गावातला म्हणजे पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादचा आहे. अरिजित आपल्या गावाकडे एक सामान्य आयुष्य जगतो. व्हिडीओमध्ये अरिजित हातात पिशवी घेऊन किराणा सामान आणण्यासाठी दुचाकीवरून जाताना दिसत आहे. या वेळी अरिजितने टी-शर्ट आणि लुंगी घातली आहे. हा व्हिडीओ गावातील त्याच्या शेजारच्यांनी शूट केला आहे. व्हिडीओमध्ये अरिजित शेजारच्यांशी बंगालीमध्ये बोलतानाही दिसत आहे. या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत अरिजितच्या साध्या राहणीमानाचं कौतुक करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आवाजाने बॉलीवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अरिजितचा चाहतावर्गही मोठा आहे. अरिजितच्या कॉन्सर्टलाही हजारो चाहते उपस्थित असतात. अरिजित सिंहला लाइव्ह ऐकण्यासाठी चाहते गर्दी करतात. अरिजित सिंह कॉन्सर्टमध्ये एक गाणं गाण्यासाठी आठ ते दहा लाख रुपये घेतो. तर एका कॉन्सर्टसाठी अरिजित एक ते दीड कोटी रुपये आकारतो. सध्या सारा अली खान आणि विकी कौशल यांचा अगामी चित्रपट ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटातील अरिजीत सिंहने गायलेलं ‘फिर और क्या चाहिए’ गाणं चांगलच गाजत आहे.