अंशुला कपूरच्या रिलेशनशिपची चर्चा, तिच्या बॉयफ्रेंडला पाहिलंत का?
कलाकार मंडळींबरोबरच त्यांच्या कुटुंबातील मंडळीही कायमच चर्चेत असतात. काही कलाकार आपल्या कुटुंबियांना झगमगत्या दुनियेपासून दूर ठेवतात. तर काही कलाकारांच्या कुटुंबातील मंडळीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. असंच काहीसं अर्जून कपूरची बहीण अंशुला कपूरच्या बाबतीतही आहे. अंशुला अभिनयक्षेत्रापासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
अंशुला तिच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिली आहे. मध्यंतरी ती तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली होती. आता अंशुलाने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे खास फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे. तिने बॉयफ्रेंडसह फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताच कपूर कुटुंबियांतील काही मंडळींनी कमेंट केल्या आहेत.
अंशुला डेट करत असलेल्या व्यक्तीचं नाव रोहन ठक्कर असं आहे. रोहन हा एक लेखक आहे. दोघंही सध्या मालदीवमध्ये आहेत. एकमेकांबरोबर एकत्रित वेळ घालवण्यासाठी अंशुला व रोहन मालदीवला गेले आहेत. याचदरम्यानचा फोटो अंशुलाने शेअर केला. या फोटोमध्ये दोघंही अगदी खूश दिसत आहेत.
स्विमिंगपुलमध्ये दोघंही एकमेकांकडे बघताना दिसत आहेत. जान्हवी कपूर, अथिया शेट्टी, खुशी कपूर यांनी कमेंट केल्या आहेत. रोहन कलाक्षेत्रामध्ये कार्यरत आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगत होत्या. आता अंशुलाने स्वतःच आपल्या नात्याबात सांगितलं आहे. या नव्या जोडप्याचं नेटकरीही कौतुक करत आहेत.