आज संपूर्ण देशभरात ईद जल्लोषात साजरी केली जात आहे. यानिमित्ताने बॉलीवूड सेलिब्रिटी आपल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. आमिर खान आपल्या कुटुंबासह ईद साजरी करताना दिसला. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर आमिर खानचे व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये आमिर जुनैद व आजाद या दोन्ही मुलांबरोबर दिसत आहे. यावेळी तिघं देखील पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओत, आमिर पापाराझींना मिठाई वाटताना दिसत आहे. तसंच पापाराझी अभिनेत्याला मिठाई भरवत आहे. एवढंच नाहीतर आमिर, जुनैद, आजाद देखील काही पापाराझींना मिठाई भरवताना पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Video: शिवानी सोनार व अंबर गणपुलेची जमली जोडी, गुपचूप उरकलेल्या साखरपुड्याचा पहिला व्हिडीओ आला समोर

या व्हिडीओमध्ये, आमिर खानची चाहती त्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी उत्सुक दिसत आहे. भर गर्दीतून ती पुढे येऊन अभिनेत्याला फोटोसाठी विचारते. यावेळी ती म्हणते, “मी खूप लांबून आली आहे.” हे ऐकून अभिनेता तिच्याबरोबर फोटो काढतो. आमिर खानचे ईद साजरे करतानाचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा – Video: डोळ्यात काजल, कपाळावर काळा टिळा, आमिर खान लेक जुनैद खान दिसला वेगळ्याच रुपात; म्हणाला, “भाई लोक…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आमिरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘लापता लेडीज’नंतर तो लवकरच ‘लाहौर १९४७’ या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटात सनी देओल प्रमुख भूमिकेत असण्याची शक्यता आहे. याशिवाय प्रीती झिंटा, शबाना आजमी, करण देओल आणि अली फजल हे देखील या चित्रपटात असू शकतात.