bollywood actor arjun kapoor reacts on malaika aroras fake pregnancy news spg 93 |"कोणाची हिंमत..." मलायकाच्या गरोदरपणावर बॉयफ्रेंड अर्जुन कपूर संतापला | Loksatta

“कोणाची हिंमत…” मलायकाच्या गरोदरपणावर बॉयफ्रेंड अर्जुन कपूर संतापला

मलायका अरोरा अर्जुन कपूर हे जोडपं सातत्याने चर्चेत येत असतात

“कोणाची हिंमत…” मलायकाच्या गरोदरपणावर बॉयफ्रेंड अर्जुन कपूर संतापला
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

अर्जुन कपूर मलायका अरोरा बॉलिवूडमधील सध्या चर्चेत असणारं जोडपं, दोघे अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांचे चाहतेदेखील त्यांच्या लग्नाची वाट बघत आहेत. मात्र अशातच मलायका गरोदर असल्याच्या बातम्या येऊ लागल्याने चर्चांना उधाण आले. आता या चर्चांनवर अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.

मलायकाच्या गरोदरपणावर अर्जुन कपूर असं म्हणाला, अशा बातम्या तथ्यहीन आणि असंवेदशील आहेत. “आमच्याबाबीत सतत अशा प्रकारच्या बातम्या आर्टिकल्समधून येत आहेत ज्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करत आहोत. हे बरोबर नाही. आमच्या खासगी आयुष्याशी कोणी खेळ करण्याची हिंमत करू नये,” अशाच शब्दात त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे.

तब्बल ३० वर्षांनंतर शाहरुख गौरी खानच्या हनिमूनचं गुपित उलगडलं…

‘पिंकविला’ने दिलेल्या माहितीनुसार, मलायका गरोदर असून अर्जुनच्या बाळाची आई होणार आहे. मलायका व अर्जुन ऑक्टोबर महिन्यात लंडन ट्रिपला गेले होते. तेव्हाच त्यांनी ही गुड न्यूज त्यांच्या नातेवाईकांना दिली असल्याची माहिती पिंकविलाने दिली होती. त्यावरून माध्यमांमध्ये या संदर्भात चर्चा होऊ लागल्या आणि अखेर अर्जुनने संतापून आपले मत व्यक्त केले.

मलायका अरोरा ही सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी तिची सोशल मीडियावर तुफान क्रेझ आहे. मलायकाच्या फॅशनची कायमच चर्चा होत असते. अर्जुन कपूर नुकताच एक ‘व्हिलन रिटर्न’ चित्रपटात दिसला होता.सलमान खानचा भाऊ अरबाज खानबरोबर घटस्फोट घेतल्यावर मलायका आता अर्जुन कपूरला डेट करत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 17:51 IST
Next Story
कोणे एके काळी दहा बाय दहाच्या खोलीत सात जणांबरोबर राहायचे अमिताभ बच्चन; आठवणींना उजाळा देत म्हणाले…