सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे बॉलीवूडमधील क्यूट कपलपैकी एक आहेत. फेब्रुवारी २०२३ मध्ये सिद्धार्थ-कियारा लग्नबंधनात अडकले. तेव्हापासून हे कपल सतत चर्चेत असतं. अलीकडेच सिद्धार्थने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये पत्नी कियाराविषयी अनेक खुलासे केले होते. आज सिद्धार्थने कियारासाठी खास पदार्थ केला होता. याचा फोटो नुकताच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रावर शेअर केला आहे.

आज, रविवार असल्यामुळे सिद्धार्थ आणि कियारा घरी एकमेकांबरोबर वेळ घालवत आहेत. यावेळी सिद्धार्थने स्वतःच्या हाताने पत्नी कियारासाठी खास पिझ्झा बनवला होता. अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीला सिद्धार्थने बनवलेला पिझ्झाचा फोटो शेअर केला असून बॅकग्राउंडला पिझ्झा पार्टी गाणं लावलं आहे. कियाराने पिझ्झाचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, “रविवार सर्वोत्कृष्ट शेफ सिद्धार्थबरोबर.. कधीच इतका चविष्ट हेल्दी पिझ्झा खाल्ला नाही…”

हेही वाचा – तमन्ना भाटियाशी लग्न कधी करणार? अभिनेता विजय वर्मा म्हणाला, “मी…”

हेही वाचा – Video: जान्हवी कपूरबरोबर ओरीचा ‘पिंगा’ गाण्यावर जबरदस्त डान्स; व्हिडीओ झाला व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, कियारा लवकरच ‘गेम चेंजर’ चित्रपटात झळकणार आहे. तर सिद्धार्थचा ‘योद्धा’ चित्रपट ८ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर ओझा आणि सागर आंब्रे यांनी केलं आहे. तर करण जोहर, शशांक खेतान, अपूर्वा मेहता यांनी सिद्धार्थच्या चित्रपटाची निर्मिती केली आहे.