बॉलीवूडच्या तरुण आणि हॉट अभिनेत्रींमध्ये पूजा बेदीची मुलगी आलिया फर्निचरवालाच्या नावाचा समावेश होतो. आलिया तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. मात्र आजकाल आलिया तिच्या नियमांमुळे चांगलीच चर्चेत आहे. आलियाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती वाहतूक नियम मोडणाऱ्यांचे क्लासेस घेताना दिसत आहे.

हेही वाचा- “रणबीर कपूर गेला खड्ड्यात” अभिनेत्याबद्दल केलेल्या या वक्तव्यावर उर्फी जावेदचे स्पष्टीकरण; म्हणाली “मी असं…”

व्हिडिओमध्ये आलिया कारमध्ये बसलेली आहे आणि अचानक तिची नजर चुकीचा यू-टर्न घेणाऱ्या दुचाकीस्वारांवर पडते. हे पाहून आलियाला अचानक राग येतो आणि म्हणते- २ दुचाकीस्वारांनी चुकीचा यू-टर्न घेतल्याचे पाहिलतं का तुम्ही निष्काळजीपणालाही मर्यादा असते. अशा लोकांवर काही कारवाई झालीच पाहिजे. अशा लोकांना ड्रायव्हिंग सेन्स किंवा ट्रॅफिकिंग सेन्स नाही किंवा त्यांना अक्कलही नाही. अशा लोकांमुळे रोज किती लोकांचे बेकार अपघात होतात माहीत नाही.

हेही वाचा- “अमिताभ बच्चन यांच्यासाठी चांगल्या भूमिका लिहिल्या गेल्या, पण..”; हेमा मालिनींनी व्यक्त केली खंत, म्हणाल्या, “मी…”

आलियाच्या या व्हिडिओवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत. काही चाहते आलियाला ट्रॅफिक नियम स्वतः पाळण्याचा सल्ला देत आहेत. आलियाने स्वतः सीट बेल्ट लावला नाही, ज्यासाठी चाहते तिच्यावर क्लास घेत आहेत. जय मुरुडरने लिहिले आहे की आधी तुम्ही तुमचा सीट बेल्ट घाला. आणखी एका युजरने लिहिले आहे की तुम्ही तुमचा सीट बेल्ट का बांधला नाही.

हेही वाचा- ‘Tiger Vs Pathaan’मध्ये होणार या हॉलिवूड स्टारची एंट्री? सलमान-शाहरुखसह दीपिका-कतरिनाही येणार आमने सामने

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियांका चोप्राकडून आलियाचे कौतुक

एका मुलाखतीत अभिनेत्री प्रियांका चोप्राने आलिया कौतुक केले होते. आलिया बॉलिवूडची पुढची सुपरस्टार असल्याचे प्रियांका म्हणाली होती. प्रियांकाच्या या कौतुकामुळे आलिया भारावून गेली आहे. जेव्हा ती प्रियांका चोप्राची मुलाखत बघत होती तेव्हा तिचे हात पाय कापत असल्याचा खुलासा खुद्द आलियाने केला आहे.